Menu Close

उदयपूर (राजस्थान) येथे भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड !

  • ३ दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही !

  • हिंदूंकडून प्रशासनाविरुद्ध आंदोलन !

  • हिंदूंनो, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदु धर्मावर आघात करणार्‍या आरोपींवर कदापि कारवाई होणार नाही, या निश्‍चिती बाळगी आणि अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूऐक्याची वज्रमूठ सिद्ध करा !
  • केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करून हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  • असे कृत्य अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात घडले असते, तर सरकार, पोलीस आणि प्रशासन यांनी अशाच प्रकारे आरोपींना न पकडण्याची उदासीनता दाखवली असती का ? असे अकार्यक्षम पोलीस आणि प्रशासन यांना हिंदूंच्या पैशांनी का म्हणून पोसायचे ?
  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणेच आवश्यक आहे ! – संपादक
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

उदयपूर (राजस्थान) – येथील रावलिया खुर्द या गावात २० फेबु्रवारी या दिवशी येथील एका मंदिरात भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.

भगवान परशुरामाची मूर्ती असलेल्या या मंदिरात ग्रामस्थ नित्य येऊन पूजा-अर्चा करत होते. २० फेबु्रवारी या दिवशी ग्रामस्थ नेहमीप्रमाणे मंदिरात आले असता त्यांना भगवान परशुरामाच्या मूर्तीचे दोन्ही हात तोडलेले, तर पाय तोडून ते जवळील जिन्याजवळ फेकलेले दिसले. गावात ही बातमी वार्‍यासारखी पसरल्यानंतर हिंदू तात्काळ मंदिराजवळ जमा झाले. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हिंदूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि संतप्त झालेल्या हिंदूंनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर या प्रकरणी पोलिसांनी प्रथम खबरी अहवाल (एफ्.आय.आर्.) प्रविष्ट करून आरोपींचा शोध चालू केला आहे. तथापि पोलीस ३ दिवसांनंतरही (२३ फेबु्रवारीपर्यंतही) आरोपींना शोधू शकलेले नाहीत.

राजस्थानमधील परिस्थिती इराक आणि सीरिया यांच्यापेक्षाही खराब ! – भाजप

या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे खासदार अर्जुन लाल मीणा म्हणाले, ‘‘काँग्रेसशासित राजस्थामधील परिस्थिती ही इराक आणि सिरीया येथील स्थितीपेक्षाही खराब आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत अवलंबलेल्या लांगूलचालनाच्या  धोरणामुळे राजस्थानात हिंदूंना रहाणे कठीण होत चालले आहे. समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करावी.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *