अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पत्रकार परिषद
ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जीतेंद्र आव्हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेऊन त्यांच्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी करमुसे यांनी पत्रकार परिषद घेतली. करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जीतेंद्र आव्हाड यांना फटकारले असून या प्रकरणाचे पुन्हा अन्वेषण करण्याची करमुसे यांची मागणी मान्य केली आहे. तसेच ३ मासांत अन्वेषण संपवून दोषारोपपत्र प्रविष्ट करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयातने दिल्याचे करमुसे यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
(सौजन्य : Zee 24 Taas)
या प्रकरणी १४ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती, यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. आव्हाड यांच्या संदर्भात ठाणे येथील साहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याचे प्रकरण नुकतेच पुढे आले होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात