Menu Close

जर श्रीलंकेमध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेश आणि बिहार राज्‍यात ‘हलालमुक्‍त भारत’ अभियान !

भदोही येथील कार्यक्रमात उपस्‍थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे

वाराणसी (उत्तरप्रदेश) – गुजरातमध्‍ये अक्षरधाम मंदिरावर बाँबस्‍फोट करणार्‍या ३० आरोपींना फाशीची शिक्षा झाली. त्‍यांना सोडवण्‍यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही इस्‍लामी संस्‍था कायदेशीर साहाय्‍य करत आहे. जमियत उलेमा-ए-हिंद जर न्‍यास (ट्रस्‍ट) आहे, तर हलाल प्रमाणपत्राच्‍या माध्‍यमातून मिळवत असलेला लाभ घटनात्‍मक कसा ? जर श्रीलंकेमध्‍ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? हलाल प्रमाणपत्र हे भारताला इस्‍लामी राष्‍ट्र बनवण्‍याचे षड्‌यंत्र आहे. या विरोधात सर्व राष्‍ट्रप्रेमींनी एकत्र येण्‍याची आवश्‍यकता आहे, असे उद़्‍गार हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्‍यांमध्‍ये ‘हलालमुक्‍त भारत’ अभियान चालू असून त्‍या अंतर्गत झालेल्‍या एका कार्यक्रमात श्री. शिंदे यांनी वरील उद़्‍गार काढले.

भदोही येथील कार्यक्रमाला उपस्‍थित धर्मप्रेमी

उत्तरप्रदेशमध्‍ये वाराणसी, भदोही, प्रयागराज, प्रतापगड, लक्ष्मणपुरी (लखनौ), कानपूर, तसेच बिहार राज्‍यात पाटलीपुत्र (पटना) आणि भोजपूर या जिल्‍ह्यात ‘हलालमुक्‍त भारत’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले होते. या अंतर्गत जनउद़्‍घोष सेवा संस्‍थान, हिंदु जनसेवा समिती, लोकभारती, अखिल भारतीय सनातन समिती, उत्तरप्रदेश मेडिकल असोसिएशन, पवनसूत सर्वांगीण विकास केंद्र, वाराणसी व्‍यापार मंडळ, वर्ल्‍ड हिंदू फेडरेशन आणि अधिवक्‍ता परिषद आदी संघटनांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील कार्यक्रमात उपस्‍थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे आणि त्‍यांच्‍या बाजूला आसंदीवर बसलेले सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ

हलाल प्रमाणपत्राच्‍या विरोधात कायदेशीर लढा देऊ ! – धर्मप्रेमी अधिवक्‍त्‍यांचा निर्धार

पाटलीपुत्र येथील धर्मप्रेमी अधिवक्‍त्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे

या अभियानांतर्गत उत्तरप्रदेशमधील वाराणसी, भदोही, प्रयागराज, प्रतापगड, लक्ष्मणपुरी (लखनौ), कानपूर, तसेच बिहारमधील पाटलीपुत्र येथे अधिवक्‍त्‍यांसह बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. अनेक अधिवक्‍त्‍यांनी ‘हलाल प्रमाणपत्राच्‍या विरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून ते रहित करण्‍याचे मागणी करू’, असा निर्धार व्‍यक्‍त केला.

हलाल प्रमाणित उत्‍पादनांचा बहिष्‍कार करू आणि अन्‍यांनाही प्रेरित करू ! – काशी हिंदु विश्‍वविद्यालयातील युवक

काशी हिंदु विश्‍वविद्यालयातील युवकांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे आणि त्‍यांच्‍या बाजूला आसंदीवर बसलेले सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ

‘हिंदू युवकांना हलाल प्रमाणपत्राच्‍या माध्‍यमातून बेरोजगार करण्‍याचे हे षड्‌यंत्र आहे. हलाल प्रमाणित उत्‍पादनांचा आम्‍ही बहिष्‍कार करूच, याखेरीज येथील सर्व विद्यार्थ्‍यांना बहिष्‍कार करण्‍यास प्रेरित करू’, असे अभिप्राय काशी हिंदु विश्‍वविद्यालयातील युवकांनी व्‍यक्‍त केले.

हलाल प्रमाणपत्राविषयी हिंदू व्‍यापार्‍यांमध्‍ये प्रबोधन करू ! – व्‍यापारी मंडळांचा एकमताने ठराव

वाराणसी येथील व्‍यापारी मंडळातील व्‍यापार्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे, त्‍यांच्‍या बाजूला आसंदीवर बसलेले सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ आणि व्‍यासपिठावर उपस्‍थित पदाधिकारी

येथील वाराणसी व्‍यापारी मंडळ, तसेच भदोही, प्रतापगड, लक्ष्मणपुरी येथील अनेक व्‍यापारी कार्यक्रमाला उपस्‍थित होते. ‘हलाल प्रमाणपत्र भारतविरोधी कसे आहे ? याविषयी सर्व हिंदू व्‍यापार्‍यांमध्‍ये प्रबोधन करून हा विषय पोचवू आणि या विरोधात संघटित होऊ’, असे सर्वानुमते ठरले.

वर्तमानपत्रातून हलाल प्रमाणपत्राचे षड्‌यंत्र समाजासमोर उघड करू ! – कानपूर आणि पटना येथील पत्रकारांचे आश्‍वासन

कानपूर येथील ‘शाश्‍वत टाइम्‍स’चे संपादक श्री. मनोज दीक्षित आणि पाटलीपुत्र येथील ‘दिव्‍य रश्‍मी पत्रिके’चे संपादक अधिवक्‍ता राकेश दत्त मिश्र यांनी पत्रकारांसह एका बैठकीचे आयोजन केले होते. यामध्‍ये अनेक पत्रकारांनी ‘वर्तमानपत्रातून हलाल प्रमाणपत्राचे षड्‌यंत्र समाजासमोर उघड करू’, असे आश्‍वासन दिले.

क्षणचित्रे :

१. विविध भागात आयोजित कार्यक्रमामध्‍ये शेवटी ‘सर्वांनी हा विषय अतिशय गंभीर असून आतापर्यंत कुणीच आम्‍हाला याविषयी सांगितले नाही. समितीचे हे अभियान आजच्‍या काळाची आवश्‍यकता आहे’, असे अभिप्राय व्‍यक्‍त केले.

२. कार्यक्रमाच्‍या शेवटी अनेक जणांनी ‘आमच्‍या भागातील लोकांना आम्‍ही एकत्र करू, तुम्‍ही विषय घेण्‍यासाठी या’, असे सांगून हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले.

३. ‘लोकभारती’ या संघटनेच्‍या कार्यक्रमाच्‍या शेवटी उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांनी ‘उत्तरप्रदेश राज्‍यामध्‍येही हलाल प्रमाणपत्रावर बंदी आणावी, यासाठी कायदा करण्‍याविषयी मुख्‍यमंत्र्यांना भेटू’, असे सांगत त्‍यांनी दायित्‍व घेतले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *