Menu Close

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी मुंबईत महामोर्च्याद्वारे शासनाला आर्त साद !

वंदनीय उपस्थिती

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो आयनॉक्स चित्रपटगृहाच्या येथून दुपारी १२ वाजता शंखाच्या वीरश्रीयुक्त नादाने गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याला प्रारंभ झाला. महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीच्या वतीने निघालेल्या या मोर्च्यात प्रारंभी श्री गणेशाचा श्‍लोक आणि प्रार्थना म्हणण्यात आली. यानंतर फुंकलेल्या तुतारीने शिवकालीन प्रेरणा जागृत होण्यास चालना मिळाली. मोर्च्यात लावण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या पोवाड्यांनी सहभागी गडप्रेमींमध्ये वीरश्री संचारत होती ! छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक यांसह मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद घातली !

मोर्च्याची सांगता आझाद मैदानातील एका भव्य मांडवामध्ये झाली आणि तिथे त्याचे सभेत रूपांतर झाले.

मोर्च्यात सहभागी संघटना !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्‍व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, समस्त हिंदू बांधव संघटना, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती, हिंदु धर्मजागरण, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाचे धर्मसभा-विद्वत्संघ, सनातन संस्था, शिवराज्याभिषेक समिती, मराठा वॉरीयर्स गड-दुर्ग संवर्धक संघटना, श्री शंभूदुर्ग प्रतिष्ठान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई (वडाळा), युवा मराठा महासंघ, शिववंदनेश्‍वर प्रतिष्ठान, स्वतंत्र सवर्ण सेना, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा सेवा महासंघ या संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेले गड-दुर्गप्रेमीं

मोर्च्यात सहभागी मावळ्यांचे वंशज !

तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे, धर्मवीर संभाजी महाराज यांची दुधाई धाराऊमाता गाडे पाटील यांचे वंशज, सरनोबत अंतोजीराजे गाडे पाटील यांचे वंशज श्री. अमित गाडे, वीर कोयाजी बांदल यांचे वंशज श्री. अक्षय बांदल, मोरोपंत पिंगळे यांचे वंशज श्री. विश्‍वजित देशपांडे, कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज अप्पासाहेब गायकवाड, वीर शिवा काशिद यांचे वंशज श्री. आनंदराव काशिद, श्री पंताजीकाका बोकील यांचे वंशज गौरव बोकील

वंदनीय उपस्थिती !

श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाच्या धर्मसभा-विद्वत्संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, वसई येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *