Menu Close

‘सरकार अधिग्रहित मंदिरात भेदभाव का ?’ या विषयावरील विशेष संवाद !

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर सरकारने मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, उज्जैन

देशभरातील विविध प्रसिद्ध देवस्थानांमध्ये विशेषत: सरकारने अधिग्रहित केलेल्या देवस्थानांमध्ये दर्शन, आरती यांसाठी विविध प्रकारचे शुल्क आकारून भाविकांमध्ये भेदभाव केला जात आहे. शास्त्रीय आणि संविधानिक दृष्टीनेही भाविकांना असमानतेची वागणूक देणे चुकीचे आहे. सरकारने भाविकांची श्रद्धा, भावना यांच्याशी खेळू नये. राजकीय नेते, प्रशासकीय क्षेत्रातील लोक संविधानातील धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतात, ते मंदिरांच्या धर्मसापेक्ष गोष्टींत कसे काय हस्तक्षेप करू शकतात ? याचे उत्तर कोणी देईल का ? सरकार फक्त हिंदूंची मंदिरे नियंत्रणात का घेत आहे ? सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर सरकारने मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे, असे स्पष्ट प्रतिपादन उज्जैन, मध्यप्रदेश येथील ‘स्वस्तिक पीठा’चे पीठाधीश्वर परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सरकार अधिग्रहित मंदिरात भेदभाव का ?’ या विषयावरील विशेष संवादात बोलत होते.

जळगाव येथील अमळनेर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. दिगंबर महाले म्हणाले की, स्वत:च्या विविध त्रासांच्या निवारणासाठी भाविक मंदिरात येत असतो. मंदिरात आलेल्या भाविकाच्या श्रद्धेला पैशांतून मोजले जाते, तेव्हा ते मंदिर प्रशासन भाविकाला त्रास देते, हे दुर्भाग्यपूर्ण आहे ! याला विरोध केला पाहिजे. अन्य पंथीय त्यांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होऊ देत नाही; मात्र हिंदूंनी ते होऊ दिले. जर मंदिर व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टी थांबवायच्या असतील, तर हिंदूंनी एकत्र येऊन कृती केली पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले की, हिंदूंची मंदिरे अधिग्रहित करणारे सरकार मशिदींतील इमामांना भरघोस वेतन देते; मात्र हिंदु पुजार्‍यांकडे लक्ष देत नाही. जिथे धन-संपत्ती मोठ्या प्रमाणात गोळा होते तीच मंदिरे सरकारने आपल्या ताब्यात घेतली आहेत. आज फक्त काँग्रेसच नव्हे, तर विविध पक्षांच्या सरकारांनी हिंदूंची मंदिरे ताब्यात घेतली; मात्र अन्य पंथीय त्यांच्या प्रार्थनास्थळांचा कारभार स्वत: चालवत आहेत, हा हिंदूंवर अन्याय आहे. देशभरात सरकारीकरण केलेल्या अनेक मंदिरांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यासह हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर आघात केला जात असल्याचे माहिती अधिकारांतून उघड झाले आहे. हिंदु भाविक, मंदिर विश्वस्त आणि हिंदू संघटनांचे व्यापक संघटन झाले, तर मंदिरांविषयी होत असलेल्या चुकीच्या गोष्टी थांबवता येतील.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *