भारताची जाणीवपूर्वक अपकीर्ती करण्यासाठी रचलेल्या षड्यंत्राचाच हा एक भाग असल्याचे लक्षात येते ! भारताने यामागील लोकांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर उघड करणे आवश्यक आहे ! – संपादक
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या मुख्यालयाजवळ भारतविरोधी प्रचार करण्यात येत असलेला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ एका भारतीय विद्यार्थ्याकडून बनवण्यात आला आहे. यात रस्त्याच्या कडेला अनेक भित्तीपत्रके आणि फलक लावण्यात आले आहेत. यात भारतविरोधी मजकूर लिहिण्यात आला आहे. याद्वारे भारताची अपकीर्ती करण्यात येत आहे. या व्हिडिओच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून टीका केली जात आहे.
Anti-India hate campaign being run outside UNHRC's doorstep in Geneva; video goes viral #news #dailyhunt https://t.co/otJxa38NkH
— Dailyhunt (@DailyhuntApp) March 4, 2023
या भित्तीपत्रकांवर लिहिण्यात आले आहे की, भारतात महिलांना गुलामांप्रमाणे वागवले जाते. भारतात बालविवाह होत आहेत, त्याद्वारे बालकांच्या अधिकारांचे हनन होत आहे. ख्रिस्त्यांना सरकार समर्थित आतंकवादाचा सामना करावा लागत आहे. भारतात जमावाच्या आक्रमणात अल्पसंख्यांक मारले जात आहेत.
1/2
?Report
Secretary (West), MEA today called in Swiss ambassador raised the issue of unfounded & malicious anti-India posters in front of UN building in Geneva
Swiss ambasdor reportedly said that he would convey India's concerns to Berne with all the seriousness it deserves pic.twitter.com/om7wdeBFf5
— OsintTV? (@OsintTV) March 5, 2023
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात