रियाध (सौदी अरेबिया) – ‘अरब न्यूज’च्या वृत्तानुसार सौदी अरेबिया त्याच्या विश्वविद्यालयांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन योगासने शिकवण्याची सिद्धता करत आहे. आरोग्य चांगले रहाण्यासाठी योगाभ्यासाच्या महत्त्वावर जोर देण्यात येत आहे.
Saudi Arabia to introduce yoga in universities; agreements to be signed over next few months to promote the ancient Indian science of exercise and healing in the kingdom@alysonle tells you more
LIVE TV: https://t.co/iSR65rMKwj pic.twitter.com/khJMOcm2hc
— WION (@WIONews) March 5, 2023
सौदी योग समितीचे अध्यक्ष नौफ अल मरवाई यांनी सांगितले की, पुढील काही मासांमध्ये योगासनांना समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी सौदी अरेबियातील काही प्रमुख विश्वविद्यालयांसमवेत करार करण्यात येणार आहे. आम्ही विश्वविद्यालयांमध्ये योगासनांसाठी श्रम घेत आहोत.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात