Menu Close

जौहर महमूद याने केली डॉ. सुमेधा शर्मा हिची चाकूने हत्या !

लव्ह जिहादचा आणखी एक बळी !

जौहर महमूद आणि त्याची प्रेयसी डॉ.सुमेधा

जम्मू – येथे जौहर महमूद याने त्याची प्रेयसी डॉ.सुमेधा हिची मांस कापणार्‍या चाकूने हत्या केली. नंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी जौहर याला रुग्णालयात भरती केले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. डॉ. सुमेधा ही जम्मूतील तालाब तिल्लो भागात रहात होती, तर आरोपी जौहर हा डोडा जिल्ह्यातील भद्रवाह येथील रहाणारा आहे.

१. जौहर याने त्याच्या फेसबुक खात्यावर पोस्ट करत तो आत्महत्या करत असल्याचे सांगितले. याची माहिती त्याच्या नातेवाइकांना मिळताच त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलीस जौहरच्या घरी पोचले असता, तर दार आतून बंद असल्याचे आढळल्यावर पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. येथे डॉ. सुमेधा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली, तर जौहर घायाळ अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात नेले; मात्र डॉ. सुमेधा हिला मृत घोषित करण्यात आले, तर जौहर याच्यावर उपचार चालू आहेत. पोलिसांनी जौहरवर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

२. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सुमेधा शर्मा आणि जौहर यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही जम्मूतल्या डेंटल कॉलेजमध्ये शिकत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमेधा शर्मा जम्मू-काश्मीरपासून काही अंतरावर असलेल्या एका महाविद्यायामधून एम्.डी.एस्.चे शिक्षण घेत होती. होळीच्या सुट्टीनिमित्ताने डॉ. सुमेधा जम्मूतील तिच्या घरी आली होती. नंतर जौहरला भेटायला त्याच्या घरी गेली होती. या वेळी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने जौहरने स्वयंपाक घरातून चाकू आणून सुमेधावर आक्रमण केले आणि नंतर स्वत:वरही वार केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *