Menu Close

रायपूर (छत्तीसगड) येथे देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडणार्‍या मुसलमानानांना अटक

  • छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळेच धर्मांधांचे फावते आहे. हिंदूंनी हे लक्षात घेऊन अशा पक्षाला सत्तेतून खाली खेचणेच योग्य !
  • निधर्मीवादी सर्वधर्मसमभावाचा डोस केवळ हिंदूंनाच देत असल्याचाच हा परिणाम आहे, हे लक्षात घ्या ! -संपादक

रायपूर (छत्तीसगड) – येथील गुढीयारी भागातील रामनगर परिसरात देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडल्यानंतर येथे सहस्रो हिंदूंनी रस्त्यावर उतरून निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी समीर आणि शाहीद यांच्यासह ७ जणांना अटक केली. यांतील ५ जण हे अल्पवयीन आहेत. ही भित्तीपत्रके होळीच्या रात्री काही जणांनी फाडून होळीमध्ये टाकली होती. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण सामाजिक माध्यमांतून समोर आल्यानंतर लोकांनी निदर्शने चालू केली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *