Menu Close

‘सिंध भूमी सुफी फकिरांची असल्याने येथे हिंदु होळी खेळू शकत नाहीत’ – मौलाना महमूद

पाकमध्ये ‘जमियत उलेमा-ए-इस्लामी’च्या संमेलनात मौलाना महमूदची धमकी !

ज्या सिंधवरून भारताला ओळखले जात होते तेथे आज हिंदूंची झालेली ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक

मौलाना राशिद महमूद

इस्लामाबाद – सिंधमध्ये हिंदु होळी खेळू शकत नाहीत. ही जागा देहली किंवा मुंबई नाही. येथे केवळ महंमद पैगंबर यांचाच दिवस साजरा केला जाईल. ही भूमी सुफी फकिरांची आहे. आम्ही मुसलमानेतरांना उत्सव साजरा करण्याची अनुमती देऊ शकत नाही, अशी हिंदुद्वेषी विधाने मौलाना राशिद महमूद याने केली आहेत. त्याच्या या विधानांचा एक व्हिडिओ ‘पाकिस्तान अनटोल्ड’ (अप्रसारित) या ट्विटर खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. पाकमधील जिहादी संघटना ‘जमियत उलेमा-ए-इस्लामी’च्या संमेलनात मौलाना महमूद याने ही विधाने केली आहे. तो या संघटनेचा सिंध प्रांताचा सचिव आहे. तसेच लरकाना स्थित जामिया इस्लामियाचा उपप्राचार्यही आहे. त्याच्या विधानांवर उपस्थित लोक टाळ्या वाजवून समर्थन देत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

१. सामाजिक माध्यामांतून मौलानावर टीकाही होत आहे. पाकिस्तानमधील महिला पत्रकार वीनगास यांनी ‘ही विधाने आश्‍चर्यजनक आहेत. हिंदु सिंधच्या मातीतील लेकरे आहेत. सिंध प्रेम आणि शांतता यांची भूमी आहे. मौलानाने या विधानांसाठी क्षमा मागितली पाहिजे’, असे म्हटले आहे.

२. पाकमध्ये होळी खेळल्यावरून पंजाब आणि कराची विश्‍वविद्यालयांत हिंदु विद्यार्थ्यांना मारहाणही करण्यात आली होती. तसेच होळीवरून धर्मदेव राठी या हिंदु डॉक्टरची त्यांचा वाहनचालक हनीफ याने चाकू खुपसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *