पणजी – शेळ-सडये, शिवोली येथील राजेंद्र उपाख्य राजेश मोरजकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणार्या छत्तीसगड येथील आतानास लकडा, तसेच मनबटल एक्का या कामगारांनी मोरजकर यांच्या दुभत्या गायीची कोयत्याने हत्या केली. दीड वर्षाचे वासरू अजूनही गायब आहे. १० मार्चच्या रात्री १० वाजता ही घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या घटनेमुळे या परिसरात खळबळ माजली आहे. स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या प्रकरणातील दोन्ही संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
(सौजन्य : In Goa 24×7)
मोरजकर यांनी गाय आणि वासरू यांना घराशेजारील खुल्या जागेत एका माडाला (नारळाच्या झाडाला) बांधले होते. गाय आणि वासरू गायब झाल्याने त्यांची शोधाशोध चालू झाली. एका ‘सीसीटीव्ही’वरील चित्रीकरणात दोन्ही संशयित शेतातून एका पिशवीत काहीतरी घेऊन जातांना दिसत होते. यावरून संशय बळावला. संशयितांनी गोहत्या केल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात