Menu Close

मानवी साखळीद्वारे खडकवासला जलाशयाचे १ टी.एम्.सी. पाणीसाठ्याचे प्रदूषण रोखले !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहिमे’चे यश !

मोहिमेत सहभागी झालेले समितीचे कार्यकर्ते

पुणे – हिंदु जनजागृती समिती आयोजित खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेद्वारे १ टी.एम्.सी. (२८ सहस्र दशलक्ष लिटर) पाणीसाठ्याचे प्रदूषण मानवी साखळीद्वारे रोखण्यात आले. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे यंदाचे २१ वे वर्ष होते. खडकवासला ग्रामस्थ, अनेक हितचिंतक आणि मान्यवर या मोहिमेत प्रत्यक्ष, तसेच अप्रत्यक्षपणे सहभागी झाले. पाटबंधारे विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक आदेशाचे फलक मोहीमस्थळी लावण्यात आले होते.

क्षणचित्रे

१. या मोहिमेत पुण्यातील विविध भागांतील ५० हून अधिक धर्मप्रेमी प्रत्यक्ष सहभागी झाले.

२. येणार्‍या-जाणार्‍या अनेक मान्यवरांनी मोहिमेचे कौतुक केले.

३. काही धर्मप्रेमी मोहिमेचा विषय ऐकून प्रत्यक्ष सहभागी झाले.

मोहिमेला सहकार्य करणार्‍यांचे मन:पूर्वक आभार !

सर्वश्री दत्तात्रय कोल्हे, सागर मते, मोतीलाल ओझा, गिरीश खत्री, सारंग नवले, विशाल वरपे, अरुण बेलुसे, निखिल पायगुडे, ऋषिकेश सुमंत, खडकवासला ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, पुणे महानगरपालिका

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *