Menu Close

ब्राह्मणवाडा थडी (जिल्हा अमरावती) येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा !

श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम !

मार्गदर्शनाच्या वेळी घोषणा देतांना 1 सौ. अनुभूती टवलारे

अमरावती – जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी या गावातील श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक श्री. आकाश दाभाडे यांनी गावात जागृती होण्याच्या उद्देशाने ‘शिवव्याख्याना’चे आयोजन केले. यामध्ये आकर्षण म्हणजे बालमनावर शिवबांचे संस्कार व्हावेत, यासाठी त्यांनी बालशिवबा आणि जिजामाता यांना तयार करून व्यासपिठापर्यंत मावळ्यांसहित पुष्पवृष्टी करून आणून स्वागत करण्यात आले. महाराजांच्या महाआरतीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. शिवव्याख्यात्या कु. साक्षीताई पवार यांनी शिवचरित्र सांगून सर्वांमध्ये छत्रपतींचे तेज निर्माण केले आणि त्यांच्या शक्तीची माहिती दिली.

रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांनी छत्रपतींची भक्ती आणि धर्माचरणाचे महत्त्व यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समितीच्या वतीने स्वरक्षणाची प्रात्याक्षिकेसुद्धा दाखवण्यात आली. ३५० हून अधिक शिवभक्तांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर गावातील मान्यवर आणि शिवभक्त यांनी ‘गावात नियमित असे कार्यक्रम करावेत’, अशी इच्छा व्यक्त केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *