Menu Close

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेबसिरीजवर बंदी घाला !

सोलापूर येथे ‘हिंदु राष्‍ट्र जागृती आंदोलना’द्वारे हिंदूंची एकमुखी मागणी !

सोलापूर – ३ मार्चपासून ‘झी-५ (ZEE 5)’ या ओटीटी प्‍लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेबसिरीजद्वारे हिंदूंवर अत्‍याचार करणार्‍या क्रूर अकबर आणि त्‍याच्‍या परिवाराचे म्‍हणजेच मोगलांचे उदात्तीकरण केले जात आहे. त्‍यामुळे वेबसिरीजवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनाद्वारे येथे करण्‍यात आली. आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे, श्री. नितीश जावळकोटी, धर्मप्रेमी श्री. आनंद कोंडा, श्री. राहुल वडनाल, अधिवक्‍ता अर्चना बोगम यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री यश मुगड्याल, श्रीनिवास श्रीगांधी, मल्लेश मारा, श्रीकांत बिंगी, श्रीकांत मुटकिरी, जयेश चिन्‍नी, आेंकार म्‍हंकाळ यांसह अन्‍य कार्यकर्ते उपस्‍थित होते.

आंदोलनात हस्‍तफलकाद्वारे जागृती करणारे धर्मप्रेमी
आंदोलनात हस्‍तफलकाद्वारे जागृती करणारे धर्मप्रेमी

१. देहलीवर राज्‍य करणारा हिंदु राजा विक्रमादित्‍य हेमू हा युद्धात बेशुद्धावस्‍थेत असतांना १४ वर्षांच्‍या अकबराने त्‍याचा शिरच्‍छेद केला. ज्‍या अकबराने सहस्रो हिंदूंचे शिरच्‍छेद करत त्‍यांच्‍या मस्‍तकांचे मिनार केले; ज्‍यांच्‍या काळात शेकडो मंदिरे उद़्‍ध्‍वस्‍त केली; हिंदूंचे धर्मांतर केले; हिंदु स्‍त्रियांवर अत्‍याचार करत त्‍यांना विकण्‍यात आले, अशा मोगलांचे उदात्तीकरण करणारी वेबसिरीज, म्‍हणजे हिंदूंच्‍या जखमांवर मीठ चोळणेच होय !

२. वेबसिरीजमध्‍ये अकबराची भूमिका साकारणारे अभिनेता नासिरूद्दीन शाह यांनी मोगलांविषयी कौतुकोद़्‍गार काढून  त्‍यांच्‍या क्रूरतेला पाठीशी घालून धार्मिक तेढ निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला. यापूर्वीही त्‍यांनी हिंदूंना डिवचणारी वक्‍तव्‍ये करत हिंदु – मुसलमान यांच्‍यात जातीय दुही निर्माण केली होती. त्‍यामुळे शाह यांच्‍यासारख्‍या मोगलप्रेमी कलाकारांवरही कारवाई व्‍हायला हवी, अशी मागणीही या आंदोलनात करण्‍यात आली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *