Menu Close

हलाल अर्थव्यवस्था हे भारतविरोधी षड्यंत्र – रमेश शिंदे , राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

झारखंडमध्‍ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान’

राजकमल सरस्‍वती विद्या मंदिर, धनबाद येथे उपस्‍थितांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे आणि बाजूला बसलेले सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ

धनबाद (झारखंड) – झारखंडमध्‍ये हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान’ राबवण्‍यात आले. समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी या अभियानाच्‍या अंतर्गत विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. या वेळी श्री. शिंदे म्‍हणाले, ‘‘हलाल अर्थव्‍यवस्‍था हे भारतविरोधी षड्‌यंत्र आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे ते रोखले पाहिजे.’’ या अभियानांतर्गत बोकारो, धनबाद येथे विविध बैठकांचे आयोजन करण्‍यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात साधनेची आवश्‍यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. या विविध बैठकांचे सूत्रसंचालन समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्‍य समन्‍वयक श्री. शंभू गवारे यांनी केले. या अभियानांतर्गत ‘बोकारो चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज’चे अध्‍यक्ष श्री. संजय वैद्य, ‘तरुण हिंदु’चे संस्‍थापक डॉ. नील माधव दास, राजकमल सरस्‍वती विद्या मंदिराचे अध्‍यक्ष श्री. विनोद तुलसियान, झरिया येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. निर्मल काजरिया, सरस्‍वती शिशु मंदिराचे मुख्‍याध्‍यापक श्री. सत्‍यनारायण पाठक यांची भेट घेतली.

बोकारो

बोकारो येथील जैन मंदिरामध्‍ये मार्गदर्शनाला उपस्‍थित जिज्ञासू

१. या अभियानाच्‍या अंतर्गत सरस्‍वती शिशु मंदिर, बोकारो येथे बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये धर्मप्रेमी सर्वश्री रंजित सिंह, कौशल किशोर राय, भाजपचे सर्वश्री रोहित लाल सिंह, योगेंद्र कुमार, कृष्‍णा राय, समाजसेवक सर्वश्री रंजन कुमार, प्रकाश कुमार साह, प्रभाकरजी, कौशिक कुमार ठाकूर, चैतन्‍यजी, सनातन संस्‍कृतीचे सर्वश्री विजेंद्र नारायण दत्त, जितेंद्र मिश्र कृष्‍ण देव, सागरजी, उपेंद्र कुमार आणि हिंदु राष्‍ट्र सेनेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. विमल देव सहभागी झाले होते.

२.  जैन मंदिरामध्‍ये ‘बोकारो चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज’चे अध्‍यक्ष श्री. संजय वैद्य यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सर्वश्री सिद्धार्थ पारिख, प्रकाश कोठारी, राजकुमार प्रिय, कमलकांत सिंह, नंदकिशोर राय, एस्.सी. गुप्‍ता, सुदर्शन प्रसाद, कौशल किशोर राय, डॉ. साकेत मिश्रा, संतोष अग्रवाल, राजेश सिंह राजू, तसेच अन्‍य उद्योगपती आणि व्‍यापारी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. यासह राजस्‍थान भवन, कतरासगड येथे बैठकीचे आयोजन केले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *