Menu Close

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा निर्धार !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ? – संपादक

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

बेळगाव – बांगलादेशातील लोक आसाममध्ये येतात आणि भारताच्या सभ्यतेला अन् संस्कृतीला धोका निर्माण करतात. मी ६०० मदरसे बंद केले आहेत आणि सर्व मदरसे बंद करण्याचा माझा मानस आहे; कारण आम्हाला मदरसे नको.  आम्हाला शाळा, महाविद्यालये आणि विश्‍वविद्यालये हवी आहेत, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी शिवाजी महाराज गार्डन येथे आयोजित सभेला संबोधित करतांना केले.

१. मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, गुप्तचरांच्या माहितीनुसार बांगलादेशातील किमान ६ आतंकवाद्यांनी वर्ष २०१६ ते २०१७ मध्ये भारतात घुसखोरी करून स्थानिक तरुणांना जिहादी विचारसरणीद्वारे आतंकवादी कारवायांसाठी सिद्ध केले.

२. मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांनी भारताचा इतिहास बाबर, औरंगजेब आणि शाहजहान यांचा असल्याचे दाखवून दिले. मला सांगायचे आहे की, भारताचा इतिहास हा त्यांच्याविषयीचा नसून छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह यांच्याविषयीचा आहे. औरंगजेबाने त्याच्या राजवटीत सनातन संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला आणि विविध लोकांना बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतरित केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *