Menu Close

हिंदूंची संपत्ती हडपण्‍याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्‍फ कायदा’ रहित करा – हुपरी येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची मागणी

हुपरी (जिल्‍हा कोल्‍हापूर) – हिंदूंची संपत्ती हडपण्‍याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्‍फ कायदा’ रहित करा, या मागणीसाठी २० मार्चला हुपरी येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे म्‍हणाले, ‘‘राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हिंदु देवस्‍थानच्‍या भूमीवर कुणी नियंत्रण मिळवले असेल किंवा त्‍या विकल्‍या असतील, तर त्‍याची गय केली जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. गेले वर्षभर हिंदु जनजागृती समिती, तसेच समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांनी यासाठी केलेल्‍या आंदोलनाचेच हे यश आहे. यापुढील काळातही ‘वक्‍फ बोर्डा’ने हिंदूंच्‍या ज्‍या भूमी हडप केल्‍या आहेत, त्‍या परत मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. याचसमवेत ज्‍यांनी अशा प्रकारे हिंदूंची भूमी हडप केली त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’’

आंदोलन झाल्‍यावर पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी आणि हुपरी नगर परिषद प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई यांनी आंदोलनस्‍थळी येऊन निवेदन स्‍वीकारले. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे, ‘वीर शिवा काशीद प्रतिष्‍ठान’चे श्री. निळकंठ माने, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. संदीप पवार यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. या वेळी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी श्री. बापूसाहेब ढेंगे, ‘दुर्गवेध प्रतिष्‍ठान’चे श्री. नितीन खेमलापुरे, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. उमैश देनै, श्री. राजेश भोजे, मराठा समाज शहरप्रमुख श्री. मोहन वाईंगडे, शिवसेनेचे श्री. विजय जाधव, युवासेना उपशहरप्रमुख श्री. अभिनंदन माणकापुरे, मनसेचे श्री. ऋषिकेश साळी, श्री. सागर गायकवाड, रेंदाळ येथील सर्वश्री सचिन पाटील, शुभम पाटील, ओमराज माळवदे, पट्टणकोडोली येथील श्री. वीरेंद्र ढेंगळे, श्री. खानदेव होळकर, श्री. निखिल कांबळे, ‘समस्‍त हिंदू संघटन’चे श्री. रवींद्र गायकवाड, धर्मप्रेमी श्री. प्रशांत साळोखे यांसह समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्‍थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *