हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचा सहभाग
नंदुरबार – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधनपर भित्तीपत्रके लावणे, फलकलेखन करणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांना भेटून हिंदु नववर्षच्या शुभेच्छा देणे, तसेच सामूहिक गुढी उभारणे आदी माध्यमातून धर्मप्रसार आणि प्रबोधन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने नंदुरबार शहरातील श्री मोठा मारुति मंदिरात, तसेच वावद गावात सामूहिक गुढीचे पूजन करण्यात आले. या वेळी ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची प्रतिज्ञा घेण्यात आली. ‘श्री ब्रह्मध्वजाय नम: ।’, तसेच ‘श्रीराम जयराम जय जय राम ।’ हा नामजप घेण्यात आला. या वेळी हिंदूंच्या नववर्षाचे महत्त्व आणि गुढीपाडव्याचे शास्त्र सांगण्यात आले.
या प्रसंगी समितीचे कार्यकर्ते आणि इतर अन्य हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते.