Menu Close

कल्याण येथे रेल्वेच्या जागेवर अनधिकृत मजार !

रेल्वे सुरक्षा दल, पोलीस आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष

मजारीची सुरुवात अशी होते . . .

ठाणे – कल्याण येथील रेल्वेच्या बोगद्याजवळ रेल्वे रुळांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर मुसलमानांकडून अनधिकृत ढाचा बांधण्यात आला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी या ढाच्याला धार्मिक रूप देऊन प्रतिवर्षी २७ मार्च या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात उरूस भरवण्यात येतो. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची अनुमती नसतांनाही हे कार्यक्रम येथे राजरोसपणे चालू आहेत. वर्ष २०१७ पासून या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात येत असतांनाही रेल्वे सुरक्षा दल, पोलीस आणि रेल्वे प्रशासन यावर कारवाई करण्यासाठी काणाडोळा करत आहेत.

मजारीची सुरुवात अशी होते, आणि नंतर सिद्ध झालेली ही मजार

प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच अनधिकृत ढाच्याच्या परिसरात नशायुक्त पदार्थांची विक्री करणार्‍या लोकांचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून चोरीच्या उद्देशाने येथे ४ वर्षांपूर्वी हत्या केल्याचीही गंभीर घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वर्ष २०१५ मध्ये माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या  जागेवरील मजारीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच येथे कोणत्याही कार्यक्रमास अनुमती नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे; मात्र असे असले, तरीही या ठिकाणी प्रतिवर्षी २७ मार्चला उरूस भरवण्यात येतो. या ठिकाणी ३०० ते ४०० हून अधिक माणसे एकत्र येतात. या अतिक्रमणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी येथे एका दगडावर चादर घालण्यात आली. नंतर स्वतःच्या स्वार्थासाठी या ढाच्याला धार्मिक रूप देऊन त्याच्याभोवती पक्के बांधकाम असलेली खोली बांधण्यात आली. ‘हळूहळू या खोलीच्या सभोवतालचा परिसर व्यापणे चालू झाले आहे’, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथे मुसलमानांचा वावर वाढला असून यावर रेल्वे प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्त होत आहे.

कल्याण येथील अनधिकृत थडग्यावर कारवाई करा, अन्यथा त्या जागी राममंदिर बांधू ! –  कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांची चेतावणी

ठाणे – कल्याण (पश्‍चिम) येथील अनधिकृत थडग्यावर (मजारीवर) कारवाई करा, अन्यथा त्या ठिकाणी राममंदिर बांधू अशी चेतावणी कल्याण येथील मनसेच्या कायकर्त्यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील भाषणानंतर कल्याण मधील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

कल्याण येथील लालचौकी भागातील शिंदे मळा परिसरात अशोक शिंदे यांच्या मालकीची भूमी आहे. या भूमीवर धर्मांधांंनी अतिक्रमण करून थडगे बांधून त्याच्यावर चादर अंथरली आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केल्याचे भूमीचे मालक शिंदे यांनी सांगितले. आता याविषयी मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली असून यासाठी मनसेचे शाखा अध्यक्ष महेश बनकर यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पत्र दिले आहे. या अनधिकृत थडग्यावर कारवाई केली नाही, तर या ठिकाणी राममंदिर बांधणार असल्याची चेतावणी मनसेने दिली आहे. या प्रकरणामुळे कल्याण शहरातील वातावरण तापले असून महानगरपालिका यावर काय कारवाई करते ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *