Menu Close

जयपूर जिल्ह्यात नववर्षानिमित्त झालेल्या वाहनफेरीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

जयपूर (राजस्थान) – जिल्ह्यातील जमवा रामगड क्षेत्रातील ताला नामक गावात २६ मार्च या दिवशी हिंदु युवकांनी हिंदु नववर्षानिमित्त काढलेल्या वाहनफेरीवर अनेक धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. दगडफेक करणारे मोठ्या संख्येने होते. यामध्ये अनेक लहान मुलेही सहभागी झाली होती. या प्रसंगी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ५० पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. कालांतराने पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून धर्मांध मुसलमानांवर कारवाई केली, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘हिंदु रणभेरी बाइक रैली’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या वाहनफेरीत १ सहस्र दुचाकीस्वार हिंदु धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

जयपूर (ग्रामीण) लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार राजवर्धनसिंह राठोड यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, काँग्रेसच्या सत्ताकाळात पी.एफ्.आय.सारखी आतंकवादी मानसिकता समाजात वाढत आहे. हे सरकार हिंदूंच्या कार्यक्रमांवर दगडफेक करणार्‍यांवर कोणतीच कारवाई करत नाही. या घटना लांगूलचालनाचा परिपाक आहेत. प्रशासनाने असे मदरसे आणि दंगलखोर यांच्यावर तत्परतेने कारवाई करावी.

स्रोत : सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *