थिरूवनंथपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील मलप्पूरमच्या अंगदिपूरम येथे असलेल्या सुप्रसिद्ध थिरुमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या संदर्भात प्रविष्ट केलेली याचिका स्वीकारली आहे. मंदिराच्या महोत्सवासाठी बनवण्यात आलेल्या ‘पूरम आयोजन समिती’च्या महत्त्वपूर्ण पदांवर मुसलमानांच्या नियुक्तीला आव्हान देणारी ही याचिका ‘हिंदू ऐक्य वेदी’ने प्रविष्ट केली आहे. मंदिराचा महोत्सव २८ मार्चपासून ७ एप्रिल या कालावधीत असणार आहे.
The petitioner wants the temple festival committee to be reconstituted without the Muslim members. #secularism #thirumandhamkunnutemple #templefestivals https://t.co/0ScSlsnU1U
— Onmanorama (@Onmanorama) March 24, 2023
१. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’चे खासदार अब्दुस्समद समदानी हे या समितीचे मुख्य संरक्षक असून समितीचे अध्यक्ष हे लीगचेच आमदार मंजलमकुजी अली आहेत.
२. ‘वर्डिक्टम्’ या कायदेविषयक माहिती प्रसारित करणार्या संकेतस्थळानुसार ‘हिंदू एक्य वेदी’चे सचिव पी.व्ही. मुरलीधरन् यांनी म्हटले की, उत्सव समितीची स्थापना देवस्वम बोर्डाच्या नियमांच्या विरोधात करण्यात आली आहे. बोर्डानुसार समितीच्या महत्त्वपूर्ण पदांवर केवळ हिंदूंचीच नियुक्ती करता येऊ शकते.
स्रोत : सनातन प्रभात