अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांची अशा प्रकारची विटंबना झाल्याचे कधी ऐकले आहे का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
श्रीरामपूर (जिल्हा नगर) : येथील गिरमे चौकातील प्रवरा डाव्या कालव्याजवळच्या झाडाखाली असणार्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना एका अज्ञाताकडून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन विटंबना झालेली मूर्ती विसर्जित करून तिच्या जागेवर नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. (हिंदूंनो, केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना करून शांत राहू नका, तर गुन्हेगाराला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२० मे या दिवशी सकाळी येथील एक दुकानदार दुकान उघडण्यास आले असता ते नेहमीप्रमाणे श्री हनुमानाच्या दर्शनासाठी गेले. त्या वेळी त्यांना मूर्तीची विटंबना झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे अशोक थोरे, शहरप्रमुख सचिन बडदे, भाजपचे अभिजित कुलकर्णी आदी कार्यकर्ते आणि परिसरातील अनेक दुकानदार जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती देताच राज्य राखीव दलाचे पोलीस आणि स्थानिक पोलीस बंदोबस्तासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी मूर्तीची पूजा करणारे पुजारी प्रसाद कुलकर्णी यांचा जबाब नोंदवला असून तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात