Menu Close

जामिया मिलिया विद्यापीठ हिंसेप्रकरणी ९ धर्मांध मुसलमानांवर आरोपनिश्‍चिती !

नवी देहली – वर्ष २०१९ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठासमोर झालेल्या हिंसेच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत ११ पैकी ९ आरोपींवर आरोपनिश्‍चिती केली आहे. ‘व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, जमावाच्या पहिल्या ओळीतील लोक देहली पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत, तसेच तेथे असलेले ‘बॅरिकेड’ ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

यामुळे आता शरजील इमाम, सफूरा जरगर आणि आसिफ इकबाल यांच्यासमवेत ९ जणांना आरोपी म्हणून निश्‍चित करण्यात आले आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी निर्णय देतांना म्हटले की, शांततापूर्वक लोकांना एकत्र करण्याच्या अधिकारांतर्गत हिंसा करणे अथवा हिंसा भडकावण्याची भाषणे देणे अंतर्भूत नाही !

काय आहे प्रकरण ?

वर्ष २०१९ मध्ये नागरिकत्व संशोधन विधेयक आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्यांच्या विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाच्या बाहेर काही धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केला होता अन् विद्यापिठाच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी १२ जणांना अटक करण्यात आली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *