Menu Close

पाळधी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या सप्तश्रृंगी पालखीच्या दिंडीवर दगडफेक !

  • एका पोलिसासह ३ हिंदु भाविक घायाळ !

  • धर्मांधांकडून १० चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड !

  • १०० हून अधिक जणांच्या विरोधात गुन्हे नोंद

  • ४५ धर्मांध, तर ५ हिंदू कह्यात !

  • अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • कायद्याचा धाक नसणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अल्पसंख्य म्हणवणार्‍या आणि बहुसंख्यांकांच्या जिवावर उठलेल्यांचा हा उद्दामपणा नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?
  • धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ सरकार अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करेल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे ! – संपादक
धर्मांधांनी पालखीवर दगडफेक केल्यानंतर रस्त्यावर विखुरलेले दगड

जळगाव – जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे २८ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘वीर जवान मित्र मंडळा’च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे सप्तश्रृंगी वणी गडावर पालखीची दिंडी जात असतांना १०० ते १५० जणांचा जमाव असलेल्या धर्मांधांनी पालखीवर दगडफेक केली. या दगडफेकीत एका पोलिसासह ३ भाविक घायाळ झाले असून धर्मांधांनी ३ वाहनांचीही तोडफोड केली आहे. पाळधी गावात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त असून गावात तणावपूर्व वातावरण आहे. २९ मार्च या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद होती. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे.

पाळधी गावात तैनात करण्यात आलेला पोलिसांचा कडकोट बंदोबस्त

असे पोलीस भारताचे कि पाकचे ?

या प्रकरणी धर्मांधांवर कारवाई करण्याविषयी तक्रार घेण्यास नकार देणार्‍या पोलिसांवर हिंदूंनी दबाव आणल्यानंतर पोलिसांनी धर्मांधांवर गुन्हे नोंद केले. (हिंदूंची तक्रार न घेणार्‍या संबंधित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते असे म्हणता येईल का ? दंगल झालेली समोर दिसत असूनही हिंदूंना त्यासाठी पोलिसांवर दबाव आणावा लागत असेल, तर ‘पोलिसांवर कुणाचा दबाव आहे ?’, हे पुढे आले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या काळातील पोलीस हिंदूंना अशी वागणूक देतात, हे दुर्दैवी ! – संपादक)

 

दिंडीवर धर्मांधांकडून दगडफेक चालू असतांना पोलीस पळून गेले !

पाळधी गावात प्रतिवर्षीप्रमाणे सप्तश्रृंगी देवीच्या पालखीची मुख्य मार्गावरून दिंडी काढली जाते. या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर एक मशीद आहे. २८ मार्च या दिवशी ही दिंडी जात असतांना त्या मशिदीजवळ पालखी आली असता अचानक धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक चालू केली. या दगडफेकीत पालखीतील सप्तश्रृंगी देवीच्या प्रतिमेची काच फुटली, तसेच ३ हिंदु भाविक घायाळ झाले. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे दिंडीतील हिंदूंची धांदल उडाली. सर्वत्र पळापळ चालू झाली. ही दगडफेक ५ मिनिटे चालू होती. या वेळी दिंडीच्या रक्षणासाठी नियुक्त केलेल्या २ पोलिसांनी हिंदूंचे रक्षण करण्याऐवजी स्वतःचा जीव मुठीत धरून अक्षरशः पळ काढला. त्यामुळे हिंदूंचे रक्षण करण्यासाठी तेथे कोणतेही पोलीस नव्हते. (धर्मांधांपासून स्वत:चा बचावही करू न शकणारे पोलीस सर्वसामान्यांचे रक्षण कसे करणार ? हिंदूंनो, यावरून बोध घ्या ! मिरवणुकांच्या रक्षणासाठी तुमचेच संरक्षण पथक सिद्ध ठेवा ! – संपादक)

हिंदूंच्या दबावानंतर पोलिसांकडून धर्मांधांना पकडण्यासाठी हालचाली चालू !

पाळधी गावातील हिंदुत्वनिष्ठ, ग्रामस्थ आणि धर्मप्रेमी यांनी धर्मांधांच्या भ्याड कृत्याला न कचरता संघटित होऊन पोलीस ठाणे गाठले. या वेळी या सर्वांनी धर्मांधांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली; मात्र पोलिसांनी ‘धर्मांधांना आता पकडतो, नंतर अटक करतो’, असे सांगून १ घंटा वेळ मारून नेली. धर्मांधांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करू लागले. शेवटी सर्व हिंदुत्वनिष्ठ, ग्रामस्थ आणि धर्मप्रेमी यांनी संघटितपणे पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळे हिंदूंचा रोष पाहून पोलिसांनी ‘धर्मांधांच्या भागात जाऊन त्यांना अटक करतो’, असे सांगितले.

धर्मांधांनी महिला पोलिसाच्या डोळ्यांत मिरचीचे पाणी फेकले !

धर्मांधांना पोलिसांचे जराही भय राहिले नसल्याचे यातून दिसून येते. अशांवर पोलीस काय कारवाई करणार ?

हे सर्व चालू असतांना धर्मांधांनी हातात शस्त्रे घेऊन हिंदूंचे दिशेने येण्यास प्रारंभ केला. या वेळी धर्मांधांनी पोलिसांचे १ वाहन आणि धरणगाव पंचायत समितीचे सदस्य मुकुंद नन्नवरे यांच्या वाहनाचीही तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. जळगाव पोलिसांनी धरणगाव आणि चोपडा येथून रात्री १.३० वाजता पोलिसांचा अतिरिक्त राज्य राखीव दलातील पोलिसांना बंदोबस्त मागवला. हे पोलीस धर्मांधांना पकडण्यासाठी गेले असता धर्मांधांनी एका महिला पोलीस हवालदाराच्या डोळ्यांत मिरचीचे पाणी मारून त्यांना लाथ मारली, तसेच धर्मांधांनी पोलिसांंच्या दिशेने काचेच्या बाटल्याही फेकल्या. भंगार दुकानातील काचेच्या बाटल्या घेऊन धर्मांधांनी बाजारपेठेत धुमाकूळ घातला. त्यामुळे पायी चालण्यासाठीही रस्त्यावर जागा नसल्याचे चित्र होते. गावात १० ते १५ चारचाकी आणि दुचाकी यांची तोडफोड करण्यात आली. दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.

हिंदूंनी साहाय्याला येऊ नये; म्हणून धर्मांधांनी रस्ते अडवले !

हिंदूंनी येऊ नये म्हणून धर्मांधांनी पाळधी गावातील काही रस्त्यांवर वाहने आडवी लावून रस्ते बंद केले होते. (दंगल घडवण्याआधी धर्मांध कशा प्रकारे हिंदूंना कोंडित पकडतात, याचे उदाहरण. हे लक्षात घेऊन हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक ! – संपादक)

धर्मांधाकडून पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न !

शेख सलीम शेख गणी कुरेशी याने त्याच्या कह्यातील ट्रक हा पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस हवालदार जितेश नाईक हे घायाळ झाले आहेत, तसेच शेख याने पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. (अशा उद्दाम धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यास त्यांच्यावर वचक बसेल ! – संपादक)

गावाच्या दिशेने जाणार्‍या हिंदूंना अडवले !

पाळधी गावातील पालखीवर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच जळगाव येथील तरुणांचा जत्थाही पाळधी येथे आला. हिंदू पाळधी गावाकडे येत असतांना पोलिसांनी वाटेतच वाहने अडवून वाहनांची पडताळणी करून अनेकांना माघारी परतवून लावले. (हिंदूंसमोर मर्दुमकी दाखवणारे पोलीस धर्मांधांसमोर मात्र नांगी टाकतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संशयितांची धरपकड चालू !

२८ मार्चच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ज्या भागात दगडफेक झाली, त्या भागातील संशयितांची धरपकड केली. गावातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. या प्रकरणी रात्री विलंबापर्यंत गुन्हे नोंद करण्याचे काम चालू होते. पोलिसांनी हिंदु आणि धर्मांध मिळून एकूण १०० ते १२५ जणांना कह्यात घेतले असून त्यांतील ४५ जणांना अटक केल्याचे समजते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *