एका राज्यातील एका वैदिक संस्कृत पाठशाळेत गेलो असतांना बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले, आमच्या वेद पाठशाळेतील मुलांना शासनाकडून शिष्यवृत्ती आणि भोजनाचा व्यय यांसाठी अंदाजे १ सहस्र ५०० रुपये अनुदान मिळते. राजकारणी किंवा शासकीय अधिकारी आमच्यावर दबाव आणतात. तुम्ही वेदपाठशाळेत मागासवर्गियांना प्रवेश देऊन त्यांना वेद शिकवावेत.
तुम्ही असे केल्यास आम्ही तुम्हाला अधिकाधिक अर्थसाहाय्य देऊन तुमच्या पाठीशी राहू.
याविषयी ते म्हणाले, मी त्याविषयी अभ्यास करून आणि धर्ममार्तंडांना विचारून निर्णय घेईन.
यावरून असे लक्षात येते की, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या एका पक्षाप्रमाणे एक तथाकथित हिंदुत्ववादी पक्षही अन्य धर्मियांच्या धार्मिक कारभारात, त्यांच्या रुढी आणि परंपरा यांत ढवळाढवळ करत नाही; मात्र हिंदु धर्मात ढवळाढवळसुद्धा करतो आणि रुढी अन् परंपरा यांना विरोध करून हिंदु धर्मावर आघात करण्याचे कार्य करतो.
– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात