Menu Close

मालवणी (मुंबई) येथे रामनवमीच्या शोभायात्रेत दंगल !

  • पोलीस ठाण्याबाहेर धर्मांध आरोपींच्या महिला नातेवाइकांचा गोंधळ !

  • २५ जण कह्यात

  • हिंदूंच्या सणांच्या वेळी मुसलमानबहुल भागात दंगली होणे, हे नित्याचे झाले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • राज्यात हिंदुत्वनिष्ठ शासन असतांना दंगलीतील दोषींवर कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी !
  • धर्मांध आरोपींना पकडल्यावर प्रशासन आणि शासन यांच्यावर दबाव आणणार्‍या त्यांच्या घरच्या महिला म्हणजे ‘चोर तो चोर वर शिरजोर’ ! -संपादक

मुंबई – मुसलमानबहुल भाग असलेल्या येथील मालवणी येथे श्रीरामनवमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेत धर्मांधांनी दंगल घडवली. मालवणी गेट क्रमांक ५ येथे शोभायात्रा आल्यावर दंगलीला आरंभ झाला. येथे मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या, तसेच पादत्राणेही फेकण्यात आली. या वेळी हिंदु आणि धर्मांध यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यात हिंदु आणि धर्मांध दोघेही घायाळ झाले. या वेळी हिंदु आणि धर्मांध दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात येत होत्या. दंगल अधिक पसरण्यापूर्वीच उपस्थित पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार केला. (पोलिसांच्या उपस्थितीतही धर्मांध दंगल करण्याचे धैर्य करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

विश्‍व हिंदु परिषद, भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दल यांच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. काही पोलिसांनी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी, तसेच खर्‍या दोषींवर कारवाई करण्यासाठी, भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. (मुसलमानांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंवर कारवाई करण्याची पोलिसांची सर्वधर्मसमभाव वृत्ती ! असे पोलीस समाजहित काय साधणार ? – संपादक)

२५ जण पोलिसांच्या कह्यात

या संपूर्ण शोभायात्रेचे चित्रण ड्रोन कॅमेरॅने होत होते, तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही या मार्गावर होते. त्यामुळे दंगल नेमकी कशी चालू झाली आणि त्यातील आरोपी कोण आहेत, हे समजणे पोलिसांना सोपे जाणार आहे. या माध्यमातून शोध घेऊन पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांना कह्यात घेतले असून अज्ञात २०० ते ३०० लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दंगलीनंतर या ठिकाणी काँग्रेसचे नेते अस्लम शेख हेही जातीने आले होते. अद्यापही येथे वातावरण तणावाचे आहे. ३० तारखेला रात्रभर पोलिसांचा पहारा या ठिकाणी होता. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकरणी पोलिसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून २०० मीटरच्या परिसरातच ही दंगल झाली.

३१ मार्च या दिवशी दंगलीतील धर्मांध आरोपींना पोलिसांनी कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेत असतांना त्यांच्या घराच्या महिला पोलीस ठाण्याच्या दारात येऊन आक्रस्ताळेपणा करत आरडाओरडा करत होत्या. अनेक धर्मांध महिला येथे जमल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना आरोपींना आत नेण्यास अडचणही होत होती. (धर्मांधांच्या दंगलीत आणि त्यांना वाचवण्यात त्यांच्या महिलांचाही कसा सहभाग असतो, ते लक्षात घ्या ! पोलीस कारवाईत अडथळे आणल्याविषयी यांच्यावरही कारवाई का होऊ नये, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?)  शेवटी महिला पोलिसांनी या धर्मांध महिलांना दूर सारण्याचा प्रयत्न केला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *