- हिंदूंना उघडपणे शिरच्छेद करण्याची धमकी देणार्यांविषयी काँग्रेस, साम्यवादी, पुरोगामी आदी गप्प का ?
- हे धर्मांधांना कायद्याचे जराही भय राहिले नसल्याचे द्योतक आहे. अशांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस काय कृती करणार ?
- भाजप सरकारने धर्मांधांचा हा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक ! – संपादक
कर्णावती – सामाजिक कार्यकर्त्या आणि हिंदुत्वनिष्ठ काजल हिंदुस्तानी यांचे ‘सर तन से जुदा’ करण्याच्या (शिरच्छेद करण्याच्या) घोषणा उना येथे कट्टरतवादी धर्मांधांनी पोलीस ठाण्याच्या समोर दिल्या. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
'Sar Tan Se Juda' slogans raised in Una in Gujarat on Jumma during Ramzan, stone pelting also took place, read details https://t.co/fSpUQoa3DL
— OpIndia.com (@OpIndia_com) April 2, 2023
१. श्रीरामनवमीच्या दिवशी शहरात शोभायात्रा काढण्यात आली होती. नंतर या शोभायात्रेचे सभेत रूपांतर झाले. त्या वेळी काजल हिंदुस्तानी यांचे भाषण झाले. या वेळी त्यांनी बळपूर्वक करण्यात येणारे धर्मांतर, लव्ह जिहाद, लोकसंख्येचा विस्फोट आदी विषयांवर प्रकाश टाकला.
२. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यामुळे सहस्रो कट्टरतवादी धर्मांधांनी रस्त्यावर उतरून ‘काजल हिंदुस्तानी यांच्यावर कारवाई करा’, अशी मागणी केली.
३. या घटनेनंतर पोलिसांनी ‘शांतता बैठक’ आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली.
४. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गिर सोमनाथ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोचले. त्यांनी हिंदु आणि मुसलमान समाजाच्या नेत्यांची पुन्हा बैठक बोलावली; मात्र या बैठकीतूनही काही निष्पन्न झाले नाही. यानंतर जमावाकडून कुंभारवाडा, कोळीवाडा, चंद्रकीरण आदी ठिकाणी दगडफेक करण्यात आली. काहींनी बाटल्याही फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ केली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात