मांस निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात लागणारे पाणी : काही उदाहरणे
वर दिलेली आकडेवारी खालील संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे. (http://www.theguardian.com/news/datablog/2013/jan/10/how-much-water-food-production-waste)
स्वस्त मांस कि भरमसाट महागाई ?
पशूचे मांस हे स्वस्त आहे, असे व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचे म्हणणे आहे. हा अत्यंत फसवा आणि भोंगळ तर्क आहे. वस्तूस्थिती काय आहे ? सर्वाधिक पाण्याचा वापर बैल, रेडा इत्यादींचे मांस बनण्यासाठी होतो. अन्न निराळेच ! अमेरिकेतील एक गाय एक किलो प्रोटीनसाठी ७५ ते ३०० किलो गवत आणि अन्नपदार्थ खाते, तर आफ्रिकेतील गायीला ५०० किलोहून अधिक खाद्य लागते.
जनावरांना असे गवत अधिक लागू लागल्यामुळे एक नामी शक्कल काढली गेली. त्यांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश झाले; पण मांस बनण्यासाठी जे धान्य जाऊ लागले, त्याचे काय ? अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठाच्या अभ्यासानुसार जगातील ४० टक्के धान्य आज या मांसनिर्मितीसाठी वापरले जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने केलेल्या अन्य अभ्यासाचा संदर्भ देऊन इंग्लंडमधील वर्ल्ड प्रिझर्वेशन फाउंडेशन या संघटनेने दिलेली पुढील माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
या माहितीनुसार गोमांस खाण्यापेक्षा डुकराचे मांस खाणे अधिक स्वस्त आहे, असा प्रचार आता हे आक्रस्ताळे व्यक्तीस्वातंत्र्यवाले करणार आहेत काय ? हा प्रश्न गोरक्षकांनी त्यांना विचारला पाहिजे. धर्मांध मुसलमानांची बाजू घेणारे यावर काय म्हणणार आहेत ?
– अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात