Menu Close

हिंदु जनजागृती समिती आणि ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ यांच्या पुढाकारातून सिंहगडावर स्वच्छता मोहीम !

पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सिंहगडावर १ एप्रिल या दिवशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ येथील शिवप्रेमी सहभागी झाले होते. गडावरील कोंढाणेश्वर मंदिर, देव टाक, अमृतेश्वर मंदिर तसेच कल्याण दरवाजा तटबंदी, हत्ती तलाव, नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी प्लास्टिक पिशव्या, मद्याच्या बाटल्या, विहिरीतील कचरा, तटबंदी भिंतीवरील गवत काढण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे कृष्णा पाटील आणि कार्यकर्ते यांनी मोहिमेचे नेतृत्व केले.

स्वच्छता मोहिमेला गडावरील स्वप्नील भोसले, प्रथमेश धुमाळ, प्रतीक सरवदे यांनी सहकार्य केले. ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’चे विद्यार्थी प्रांजली भांडे, सिद्धांत खैरनार, शिवराज पाटील यांच्या सोबतच्या सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी गडदुर्ग स्वच्छतेचे महत्त्व आलेल्या पर्यटकांना सांगत मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी गडावरील उपस्थित पर्यटक, तेथील व्यावसायिक शिवप्रेमी-दुर्गप्रेमी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, तर काहींनी या उपक्रमात सहभागही घेतला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *