Menu Close

बांदा (उत्तरप्रदेश) हनुमान चालीसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून गोदाम मालकाला मारहाण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! -संपादक

सिद्धांत तिवारी

बांदा (उत्तरप्रदेश) – येथील हाथीखाना अलीगंज भागातील गोदामामध्ये ध्वनीक्षेपकावर हनुमान चालीसा लावल्याने धर्मांध मुसलमानांनी गोदामामध्ये घुसून तोडफोड केली. यासह गोदामाचे मालक सिद्धांत तिवारी यांना मारहाण केली. त्यांना ठार मारण्याचीही धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गोदामाबाहेर पोलीस तैनात केले आहेत.

तिवारी यांनी सांगितले की, त्यांनी नेहमीप्रमाणे गोदामामध्ये सकाळी पूजा करून हनुमान चालीसा लावले होते. तेव्हा या भागातील तौफीक, शानू आणि अन्य २० जण गोदामात आले आणि त्यांनी मारहाण चालू केली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *