Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे श्रीरामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, या उद्देशाने श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्रीरामनामाच्या चैतन्यमय वातावरणात भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ पार पडली. या वेळी ‘हर घर भगवा छाएगा, रामराज्य फिर आएगा’, ‘एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम’, अशा उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या. या शोभायात्रेला हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. शोभायात्रेचा प्रारंभ वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा यांच्या हस्ते धर्मध्वज पूजनाने झाला. या शोभायात्रेत २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

शोभायात्रेत सहभागी हिंदुत्वनिष्ठ आणि १. सद्गुरु नीलेश सिंगबाळ

शोभायात्रेत सहभागी मान्यवर

काशी विश्वनाथ मंदिर मुक्तीचे याचिकाकर्ते श्री. सोहनलाल आर्य, उत्तरप्रदेश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संदीप चतुर्वेदी, ‘इंडिया विथ विझडम्’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, हिंदु युवा वाहिनीचे वाराणसी महानगर अध्यक्ष श्री. अजय सिंह, श्री आदिमहादेव काशी धर्मालय मुक्ती न्यासाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद सिंह, शीतलामाता मंदिराचे महंत अभिषेक पांडे, गुजराती समाजाचे श्री. अनिलभाई शास्त्री, जालान उद्योग समूहाचे उद्योजक श्री. निधी जालान, राष्ट्रीय मानवाधिकार तथा न्याय परिषदेचे महासचिव अधिवक्ता अरुणकुमार मौर्य, जायसवाल समाजाचे श्री. भगवानदास जायसवाल, माजी प्रधान श्री. जयप्रकाश सिंह तथा नागेश्वर पांडे, कन्हैया अलंकारचे श्री. अनिल जैन, पहाडिया व्यापार मंडळाचे महामंत्री श्री. अरविंदलाल गुप्ता, अखिल भारतीय सनातन समितीचे अध्यक्ष डॉ. अजयकुमार जायसवाल आदी उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. शोभायात्रा मार्गक्रमण करत असतांना अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे श्रीरामाच्या चित्राचे पूजन आणि पुष्पवृष्टी केली.

२. शोभायात्रेच्या सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिस्तप्रियतेचे कौतुक केले.

३. गुजराती समाजाचे श्री. अनिलभाई शास्त्री म्हणाले, ‘‘मी आजपर्यंत श्रीरामनवमीच्या निमित्ताने आयोजित अनेक कार्यक्रम पाहिले; परंतु हिंदु जनजागृती समितीची ही शोभायात्रा अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद आहे.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *