Menu Close

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे !’ – ओआयसी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (उजवीकडे)

नवी देहली –  भारतात रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराविषयी आम्ही चिंतित आहोत. भारतातील मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असे ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओआयसी) या इस्लामी देशांच्या संघटनेने निवेदन जारी करून म्हटले आहे.

ओआयसीच्या सरचिटणीसांनी जारी केलेल्या निवेदनात बिहारच्या बिहारशरीफमध्ये ३१ मार्च या दिवशी झालेल्या हिंसाचाराचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, येथे हिंदूंच्या जमावाकडून मदरशाला आणि एका वाचनालयाला आग लावण्यात आली. आम्ही अशा हिंसाचाराचा निषेध करतो. भारतीय अधिकार्‍यांनी अशा घटनांतील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशात मुसलमानांची सुरक्षा, अधिकार आणि सन्मान निश्‍चित करण्याचे आम्ही आवाहन करत आहोत. अशा प्रकारच्या हिंसक घटना या इस्लामच्या द्वेषाच्या ज्वलंत उदाहरणे आहेत.

ओआयसीचे निवेदन म्हणजे धर्मांध मानसिकतेचा नमूना ! – भारताने फटकारले

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ओआयसीच्या या निवेदनावर टीका केली. ते म्हणाले की, आम्ही भारताच्या संदर्भात ओआयसीने जारी केलेल्या निवेदनाचा निषेध करतो. ओआयसीचे हे निवेदन तिच्या धर्मांध मानसिकता आणि भारतविरोधी धोरण यांचा एक नमूना आहे. भारतविरोधी शक्तीच्या प्रभावाखाली येऊन ओआयसी स्वतःच्या प्रतिष्ठेला हानी पोचवत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *