एन्.आय.ए.ने न्यायालयात दिली माहिती
नवी देहली – गुजरातमधील सुरत शहरातील सर्व मुसलमान वस्त्या रिकाम्या करून तेथे केवळ मुसलमानेतर नागरिक राहिल्यानंतर शहरावर अणूबाँब टाकण्याचा इंडियन मुजाहिदीनचा आतंकवादी यासीन भटकळ याचा कट होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यातून हे स्पष्ट होते, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे.
भटकल ने रची थी सूरत में परमाणु बम हमले की साजिश, 11 लोगों पर आरोप तय#YasinBhatkal #IndianMujahideen #NuclearBombhttps://t.co/ByKaliWTvj
— Hindustan (@Live_Hindustan) April 4, 2023
या संघटनेचा प्रमुख आतंकवादी यासीन भटकळ याच्यासह अन्य ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सुनावणीनंतर ‘यासीन भटकळ याच्या विरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात