हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद April 7, 2023 Share On : सामूहिक नमाजपठणावरील वादाचे प्रकरण राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतुकीला अडथळा आणला. या प्रकरणी ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद नैनिताल (उत्तराखंड) – येथील हल्द्वानी शहरात अवैधपणे बांधलेल्या इमारतीत सामूहिक नमाजपठण करण्यावरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात झालेल्या वादानंतर मुसलमान समुदायातील लोकांनी कोतवाली येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतुकीला अडथळा आणला. या प्रकरणी पोलिसांनी अनुमाने ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंदवले. #Nainital police have booked around 800 unidentified people for allegedly indulging in violence, blocking the Nainital-Haldwani national highway and staging a protest near the Haldwani police station creating a ruckus, officials said https://t.co/lhRc52v3KI — HT Punjab (@HTPunjab) April 5, 2023 हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. या वेळी हिंदु संघटनेचे नेते आणि मुसलमान धर्मगुरू यांच्यात हाणामारी झाली. याचा निषेध म्हणून धर्मगुरू जफर उल्ला सिद्दिकी आणि मौलाना शाहिद हुसेन यांच्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी हिंदु नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. या वेळी अनुमाने ७०० ते ८०० मुसलमानांनी कोतवाली येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले. Tags : आंदोलनगुन्हेगारीधर्मांधपोलीसराष्ट्रीयहिंदूंवर आक्रमणRelated Newsदेशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती December 7, 2024ब्रिटनच्या संसदेत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवर व्यक्त करण्यात आली चिंता ! December 5, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती December 7, 2024
ब्रिटनच्या संसदेत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवर व्यक्त करण्यात आली चिंता ! December 5, 2024