प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना अटक आणि सुटका ! April 7, 2023 Share On : हनुमान जयंतीच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून केली अटक ! प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची अटक आणि सुटका भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी ६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करण्यात आली. त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणार्या हिंदूंच्या संघटनांच्या मिरवणुकीत टी. राजा सिंह सहभागी होणार होते. यात ते कथित आक्षेपार्ह विधाने करतील, या कारणाने त्यांना पोलिसांनी अटक केली होती. Arrested by Telangana Police on the instruction of BRS Govt just before joining #HanumanJanmotsav rally in my #Goshamahal Constituency. Now Hindus can't even take part in the rally also in Telangana? pic.twitter.com/Tdw5HhjrcW — Raja Singh (@TigerRajaSingh) April 6, 2023 १. अटकेविषयी ट्वीट करून माहिती देतांना टी. राजा सिंह यांनी सांगितले की, मी प्रतिवर्षाप्रमाणे माझ्या मतदारसंघातील श्रीराममंदिर गौलीगुडा चमन येथील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार होतो; मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी मला अटक केली. मी एक हिंदु म्हणून सरकार आणि पोलीस यांना विचारू इच्छितो की, माझ्या मतदारसंघातील भगवान हनुमानाच्या मिरवणुकीत मी सहभागी होऊ शकत नाही का ? २. श्रीरामनवमीच्या वेळी येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये टी. राजा सिंह यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. Hyderabad Police arrested me before I could join the Hanuman Jayanti procession in Goshamahal: T Raja Singh https://t.co/SL99RDmKFu — OpIndia.com (@OpIndia_com) April 6, 2023 स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Atrocities on HindusTrending Topicsअटकदंगलधर्मांधराष्ट्रीयहिंदुत्वRelated Newsवरळी (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन ! December 17, 2024शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या – हिंदु जनजागृती समिती December 15, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या – हिंदु जनजागृती समिती December 15, 2024