इतकी वर्षे चर्चने दडपल्या घटना !
- अशा घटनांमध्ये एकाही वासनांध पाद्रयाला शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! चर्चच्या कायद्यामुळेच वासनांध पाद्री शिक्षेपासून स्वतःला वाचवू शकत असल्यानेच या कायद्याचा त्यांच्याकडून अपलाभ उठवला जात आहे. त्यामुळे या कायद्यात पालट करण्याची आवश्यकता आहे !
- भारतात अशा घटनांविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, महिला संघटना, मानवाधिकारवाले चर्चा करत नाहीत, हे लक्षात घ्या – संपादक
मेरीलँड (अमेरिका) – अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. शोषण करणार्यांमध्ये जवळजवळ १५० पाद्री होते, अशी माहिती या संदर्भात सिद्ध करण्यात आलेल्या ४६३ पानी अहवालात देण्यात आली आहे. ४ वर्षांच्या संशोधनानंतर हा अहवाल बनवण्यात आला. जवळपास ८० वर्षानंतर ही गोष्ट उघड झाली. इतकी वर्षे या घटना चर्चकडून दडपण्यात आल्या होत्या.
US: More than 150 Catholic priests in Maryland targeted over 600 children in the last 80 years, a 463-page report revealshttps://t.co/w3hJ1Q06Vr
— OpIndia.com (@OpIndia_com) April 7, 2023
१. या अहवालामध्ये आरोपी पाद्रयांची ओळख उघड करण्यात आली आहे. वर्ष २०१९ मध्ये तत्कालीन अॅटर्नी जनरल ब्रायन फ्रॉश यांनी या घटनांची चौकशी चालू केली होती. १०० पीडितांच्या साक्षीनंतर आणि १ लाख पानी कागदपत्राचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल त्यांनी सिद्ध केला. न्यायालयीन अनुमती मिळाल्यानंतर हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला.
This is powerful. https://t.co/xCTNFDF391
— Brian Frosh, Former Attorney General of Maryland (@BrianFrosh) April 6, 2023
२. ज्या मुलांचे शोषण करण्यात आले आहे, ते गरीब कुटुंबातील होते. याविषयी कुठेही वाच्यता न करण्याविषयी त्यांना धमकवण्यातही आले आहे.
More than 150 Catholic priests in Maryland sexually abused 600 children, new report found https://t.co/larmQrRVoV
— Fox News (@FoxNews) April 6, 2023
३. अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर बाल्टीमोरचे आर्चबिशप (ख्रिस्ती धर्मगुरूंचे एक पद) विलियम लोरी यांनी पीडित मुलांची क्षमा मागितली आहे. ‘कॅथॉलिक चर्चच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वांत दु:खद घटना आहे, जी दुर्लक्ष करून आणि विसरून चालणार नाही. चर्चच्या उच्च पदावर असणार्या व्यक्तीद्वारे अशा प्रकारची कृत्ये करणार्यांना शिक्षा केली जाईल’, असे लोरी म्हणाले. (नुसती क्षमा मागून काय उपयोग ? उत्तरदायी वासनांध पाद्रयांना शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)
४. यापूर्वी अमेरिकेच्या इलिनोइस प्रांतातमध्ये जवळजवळ ७०० पाद्रयांवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप होते. इलिनोइसच्या अॅटर्नी जनरल यांनी त्यांच्या अहवालामध्ये या घटनांचा उल्लेख केला आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात