गौहत्ती – आसामच्या बारपेटा जिल्ह्यात ‘पी.एफ्.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या प्रतिबंधित आतंकवादी संघटनेशी संबंधित ३ जिहाद्यांना आसाम पोलिसांनी नुकतीच अटक केली. अटक करण्यात आलेले झाकीर हुसेन आणि अबू सामा हे ‘पी.एफ्.आय.’चे राज्य सचिव आहेत, तर तिसरा आरोपी शाहिदुल इस्लाम हा ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित ‘सी.एफ्.आय.’(कँपस फ्रंट ऑफ इंडिया) या विद्यार्थी संघटनेचा कोषाध्यक्ष आहे. आरोपींकडून रोख रक्कम आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
असम में PFI से जुड़े 3 संदिग्ध गिरफ्तार: संगठन पर बैन लगने के बाद SDPI में हुए शामिल, वॉट्सऐप के जरिए फैला रहे थे कट्टरपंथ#Assam #RadicalIslam #PFIhttps://t.co/jVBSU3zLzp
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 8, 2023
‘पी.एफ्.आय’चे सदस्य ‘एस्.डी.पी.आय.’मध्ये सहभागी !
‘पी.एफ्.आय’वर बंदी घातल्यानंतर त्याचे सर्व सदस्य ‘एस्.डी.पी.आय.’मध्ये सहभागी झाले आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. ‘पी.एफ्.आय.’चे सदस्य आता ‘एस्.डी.पी.आय.’च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात उतरण्याची सिद्धता करत आहेत. (यावरून केवळ पी.एफ्.आय.वरच नव्हे, तर त्याची राजकीय संघटना असणार्या एस्.डी.पी.आय.वरही बंदी घालणे आवश्यक असल्याचे आपल्याला दिसून येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)