मुंबई – ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील ‘येनतम्मा’ या गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेता सलमान खान, वेंकटेश आणि रामचरण नाचत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर त्याला हिंदूंकडून विरोध होऊ लागला आहे. हे नृत्य अश्लील आणि बीभत्स असल्यानेही याला विरोध केला जात आहे. सामाजिक माध्यमांतून माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन् आणि तमिळनाडूतील समीक्षक प्रशांत रंगास्वामी यांनी ट्वीट करून या गाण्याला विरोध केला आहे. ‘या चित्रपटाने दक्षिण भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक फरहाद समजी आहेत. (फरहाद समजी अशा प्रकार मशिदीमध्ये अभिनेते नाचतांनाचे गाणे दिग्दर्शित करतील का ? अशी गाणी मंदिरांमध्येच का चित्रित केेली जातात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
This is highly ridiculous and degrading our South Indian culture. This is not a LUNGI , THIS IS A DHOTI. A classical outfit which is being shown in a DISGUSTING MANNER https://t.co/c9E0T2gf2d
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) April 8, 2023
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात
शिवरामकृष्णन् यांनी म्हटले की, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाच्या निर्मात्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे. मंदिरात चपला घालून नाचणे चुकीचे आहे. अभिनेत्यांनी घातलेली लुंगी ही लुंगी नसून धोतर आहे. एका सांस्कृतिक परिधानाला वाईट पद्धतीने दाखवण्यात येत आहे.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात