Menu Close

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात !

  • राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि गुप्तचर विभाग यांचा निष्कर्ष

  • मुख्य संशयित आरोपी शाहरूख सैफी याला रत्नागिरीत केली होती अटक

आतंकवादी समाजविघातक कृत्ये करण्यासाठी विविध हातखंडे राबवत आहेत, हेच यातून दिसून येते. अशा आतंकवादी संघटनांची पाळे-मुळे नष्ट करणे आवश्यक ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

रत्नागिरी – केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांवर ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्यांना जाळून मारण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि गुप्तचर विभाग (आयबी) या संस्थांनी काढला आहे. त्या दिशेने येथे अटक केलेला आरोपी शाहरूख सैफी याचे अन्वेषणही चालू करण्यात आले आहे. या प्रकरणात ३ जणांचा मृत्यू आणि ९ जण घायाळ झाले होते. महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाने (ए.टी.एस्.) राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी रत्नागिरीच्या पोलिसांच्या सहकार्याने शाहरूख सैफी याला ४ एप्रिलच्या रात्री ११.३० वाजता येथील रेल्वस्थानकात कह्यात घेतले आणि नंतर त्याला केरळ आतंकवाद विरोधी पथकाच्या कह्यात देण्यात आले होते.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य संशयित आरोपी शाहरूख सैफी हा देहली येथील शाहीन बागचा रहिवासी असून त्याने जून २०२२ पासून त्याच्या जीवनशैलीत पालट केला होता. नमाज पढण्यासाठी अधिक वेळ घालवण्यासवेतच तो धर्मांधतेकडे (कट्टर वृत्तीकडे) वळल्याचा अंदाज आहे.

२. तो व्यवसायाने ‘यू ट्यूबर’ असून त्याच्या ‘यू ट्यूब चॅनेल’वर मोजकेच ‘सबस्क्रायबर’ असले, तरी सैफीला कट्टरपंथी बनवणार्‍यांनी त्याच्याशी संपर्क साधला असावा, असा त्याच्यावर संशय आहे.

३. ‘केरळमधील रेल्वे जाळण्याच्या प्रकारात एकट्यानेच हे आक्रमण केले आहे’, असे शाहरूख सांगत असला, तरी रेल्वेला आग लावण्याच्या घटनेत अन्य लोकही सहभागी असल्याचा संशय आहे.

४. ‘शाहरूखमध्ये धार्मिक कट्टरपणाची कोणतीही चिन्हे नाहीत’, असे त्याचे नातेवाईक सांगत असले, तरीही ‘शाहरूख केरळमधून अचानक गायब का झाला ?’ आणि ‘तो त्याच  गाडीत का चढला ?’, याचेही अन्वेषण चालू आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *