Menu Close

‘मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही’- फारूक अब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांना क्रूर मुसलमान आक्रमकांविषयी पुळका

  • मोगलांनी हिंदूंवर केलेले अत्याचार हिंदू कसे विसरतील ? त्यामुळे पाठ्यपुस्तकातून त्यांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळून ते किती क्रूर होते, हे विद्यार्थ्यांना शिकवावे, जेणेकरून खरा इतिहास त्यांना कळेल !
  • हिंदूंना अत्याचार करणार्‍या मोगलांविषयी मुसलमान प्रेम व्यक्त करतात आणि तरीही ‘हिंदूंनी मुसलमानांशी सर्वधर्मसमभावाने वागावे’, अशी अपेक्षा करतात, हे संतापजनक ! -संपादक

श्रीनगर – मोगलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हटवला गेला; मात्र ज्या मोगलांनी येथे ८०० वर्षे राज्य केले, त्यांना लोक कसे विसरतील ? त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही, असे फुकाचे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी केले. ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) च्या १२ वीच्या इतिहास, हिंदी आणि नागरिकशास्त्र या विषयांतील मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळण्यात आले. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना अब्दुल्ला यांनी वरील मत व्यक्त केले.

१. अब्दुल्ला पुढे म्हणाले की, लोक बाबर, अकबर, शाहजहां, औरंगजेब आणि जहांगीर यांना कसे विसरणार ? जेव्हा लोक ताजमहाल पहायला जाणार, तेव्हा लोकांना ‘तो कुणी बांधला ?’, यावर काय सांगणार ? लाल किल्ल्याचा इतिहास तुम्ही कसा लपवणार ? आम्ही असू किंवा नसू इतिहास मात्र तोच रहाणार आहे.

२. एन्.सी.ई.आर्.टी.च्या धड्यांमधून मोगलांविषयीचे धडे वगळल्यानंतर अनेक मुसलमान नेत्यांनी त्याला विरोध केला आहे. याआधी समाजवादी पक्षाचे आमदार इकबाल मसूद यांनी या निर्णयाला विरोध करत ‘मोगलांचा इतिहास पूर्ण जगात शिकवला जातो. पाठ्यपुस्तकांतून त्यांचा इतिहास हटवून काहीच होणार नाही’, असे म्हटले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *