जमशेदपूर (झारखंड) – श्रीरामनवमीनिमित्त लावण्यात आलेल्या धर्मध्वजाचा एका धर्मांध संघटनेच्या सदस्यांनी अवमान केल्याच्या प्रकरणी झारखंडमधील जमशेदपूरमध्ये दोन गटांमध्ये पुन्हा हिंसाचार झाला. जमशेदपूरमधील कदम शास्त्रीनगर येथे उसळलेल्या या हिंसाचाराच्या वेळी धर्मांधांनी दगडफेक केली, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची तोडफोड केली, तसेच गोळीबारही केला. दगडफेक करणार्यांनी दुकाने ६ दुकाने आणि २ दुचाकी वाहने जाळली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. पोलिसांनी दंगलग्रस्त परिसरात जमावबंदी लागू केली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. (हिंसाचार झाल्यानंतर जमावबंदी लागू करणारे नव्हे, तर हिंसाचार होणार नाही, यासाठी दक्ष राहून कृती करणार पोलीस हवेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
(सौजन्य : Zee News)
१. अनुमाने ३ घंटे चाललेल्या या हिंसाचारात वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांच्यासह अनेक पोलीस घायाळ झाले. (३ घंटे हिंसाचार करणार्या धर्मांधांना पोलीस रोखू शकत नसतील, तर अशा पोलिसांना हिंदूंनी कर भरून पोसायचे तरी कशाला ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) दगडफेक आणि गोंधळ घालणार्या ६० हून अधिक तरुणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
२. पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यासह संपूर्ण परिसरात अर्धसैनिक दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
जमशेदपुर में शनिवार रात दो पक्षों में हुए हिंसक झड़प शांत नहीं हुआ है। रविवार की शाम फिर दोनों पक्ष आमने-सामने आ गए। इस दौरान जमकर पथराव और फायरिंग की गई। दुकनों में आग लगा दी गई। घटना की सूचना पर भारी संख्या में पुलिस की तैनाती की गई है। धारा 144 लगा दी है। pic.twitter.com/FV59zKSFtl
— Chittaranjan Singh (@iCSRajput) April 9, 2023
३. पूर्व सिंहभूम जिल्ह्याच्या उपायुक्त विजया जाधव यांनी सांगितले की, काही समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी नागरिकांना सहकार्य करावे. (समाजकंटकांना रोखण्यासाठी नागरिकांचे साहाय्य मागणे प्रशासनाला लज्जास्पद ! जिल्हा उपायुक्तांनी पोलिसांना समाजकंटकांना वचक बसेल अशी कारवाई करण्याचा आदेश देणे अपेक्षित आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
४. यापूर्वी ३१ मार्च या दिवशी झारखंडमधील जमशेदपूर येथील जुगसलाई भागात श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला विरोध करत धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली होती. या वेळी त्यांनी रस्त्यावर टायर जाळले होते आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली होती. पोलिसांनी श्रीरामनवमीची मिरवणूक थांबवल्याने हिंदूही संतापले होते. त्यांनी येथील बाटा चौकात हनुमान चालिसाचे पठण चालू केले होते.
(सौजन्य : TV9 Bharatvarsh)
का झाला हिंसाचार ?
कदम शास्त्रीनगर ब्लॉक क्रमांक ३ चौकात ९ एप्रिलच्या सायंकाळी धर्मांध मुसलमानांनी मांसाने भरलेली प्लास्टिक पिशवी धर्मध्वजाच्या बांबूला बांधली होती. ब्लॉक क्रमांक २ येथील जटाधारी हनुमान मंदिरात हिंदूंच्या संघटनांची बैठक झाली. या बैठकीत येथील चौकाला ‘बजरंग बली चौक’ असे नाव देण्याचा ठरले. त्यामुळे या बैठकीवर अचानक दगडफेक चालू झाली. यानंतर हिंसाचार उसळला.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात