खोपोलीत धर्मांतरविरोधी कायद्यासाठी आंदोलन April 11, 2023 Share On : हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी रायगड – देशभरात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. गरीब हिंदूंना फसवून किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर केले जाते. पूर्वोत्तर भारतात आज अनेक राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत. हे रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी जात-पात, पद, पक्ष, संप्रदाय आणि संघटना बाजूला ठेवून धर्मासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी येथे केले. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी खोपोली येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे खोपोली विभाग कार्यवाह श्री. दीपक गिरी, तसेच धर्मप्रेमी श्री. महेश बारी आणि श्री. मनोज कांगणे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी हातात भगवे ध्वज आणि हस्तफलक घेऊन घोषणा देण्यात येत होत्या. स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Hindu Janajagruti SamitiReligious ConversionsRelated Newsबांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत January 6, 2025कुंभमेळ्याच्या भूमीवर वक्फचा दावा करणाऱ्या मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी January 5, 2025एनआरसी लागू करून बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून लावण्यासाठी पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती January 5, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
कुंभमेळ्याच्या भूमीवर वक्फचा दावा करणाऱ्या मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी January 5, 2025
एनआरसी लागू करून बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून लावण्यासाठी पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती January 5, 2025