मुंबई – हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ‘फेसबूक’वर प्रसारित केलेली ‘ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज होते’, ही ‘पोस्ट’ हटवली. याविषयी क्षमायाचना करतांना त्यांनी ‘यापुढे कुठलीही पोस्ट करतांना गांभीर्याने विचार करीन आणि सावधानता बाळगीन’, असे म्हटले आहे.
या वादग्रस्त पोस्टमध्ये लकी अली यांनी म्हटले होते की, ब्राह्मण’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘ब्रह्मा’ या शब्दापासून झाली आहे. हा शब्द ‘अब्राहम’ किंवा ‘इब्राहिम’ पासून आला आहे. यावरून ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहेत. त्यामुळे आपापसांत भांडून काय निष्पन्न होणार आहे ? (‘ब्रह्म जानति इति ब्राह्मणः’ अशी ‘ब्राह्मण’ या शब्दाची व्याख्या आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या चार वर्णांपैकी ‘ब्राह्मण’ हा पहिला वर्ण होय. अली लकी यांनी ज्या नावांपासून ‘ब्राह्मण’ शब्दाची व्युत्पत्ती झाल्याची वल्गना केली आहे, त्या पंथांची त्या वेळी व्युत्पत्तीही झाली नव्हती ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
पोस्ट मागे घेतांना अली यांनी ‘माझ्या पोस्टमुळे वादंग निर्माण झाल्याचे माझ्या ध्यानात आले आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तसे घडले असल्यास मला त्याचा खेद आहे. आपण सगळ्यांनी एकत्र यावे, हाच माझा यामागील उद्देश होता. माझे अनेक हिंदु बंधू-भगिनी यामुळे दुखावले गेले आहेत. त्यासाठी मी त्यांची मनापासून क्षमायाचना करतो’, अशी क्षमायाचनेची दुसरी पोस्ट ‘फेसबूक’वर प्रसारित केली आहे. लकी अली हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आहेत. सध्या ते बेंगळुरू येथे स्थायिक आहेत.
Bollywood singer Lucky Ali apologises for his ‘Brahman are a lineage of Ibrahim’ Facebook posthttps://t.co/1NrwPLmTek
— OpIndia.com (@OpIndia_com) April 12, 2023
स्रोत : दैनिक सनातन प्रभात