हिंदूंच्या धार्मिक भावनांचा दुखावणारे मौलाना अर्शद मदनी यांच्यावर कारवाई करा ! April 13, 2023 Share On : हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदू संघटनांकडून बेंगळुरू येथील गिरिनगर पोलीस निरीक्षकांना तक्रार ! (मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक) हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदू संघटनांकडून बेंगळुरू येथील गिरिनगर पोलीस निरीक्षकांना निवेदन देताना बेंगळुरू (कर्नाटक) – देहलीच्या रामलीला मैदानात १० ते १२ फेब्रुवारी या काळात जमियत उलेमा-ए-हिंदच्या ३४ व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी ‘ॐ आणि अल्ला दोन्ही एकच आहेत’, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य हिंदु धर्म आणि हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा यांचा अवमान करणारे होते. मौलाना अर्शद मदनी यांच्यावर समस्त हिंदू एकता संघटनांच्या वतीने बेंगळुरू येथील गिरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्तेे श्री. मोहन गौडा, राष्ट्रीय हिंदु परिषदेचे श्री. सुरेश गौडा, गिरीश कुमार, उदय शेट्टी, विक्रम शेट्टी, बजरंग दलाचे श्री. राघवेंद्र, प्रा. एन्. उमाशंकर, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह सर्व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. मदनी यांनी ‘अॅडम आणि मनु दोन्ही एकच आहेत’, असेही वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. Association Of Hindu Organisations file complaint at @girinagarps demanding arrest of Jamiat Ulema i Hind's Maulana Arshad Madani for offences under IPC, 1860 & IT Act, 2000, for insulting Hindu religion and religious beliefs@publictvnews @VVani4U @Vijaykarnataka @udayavani_web pic.twitter.com/iorGatdmVV — HJS Karnataka (@HJSKarnataka) April 11, 2023 स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Hindu Janajagruti Samitiराष्ट्रीयहिंदु जनजागृती समितीकडून निवेदनहिंदुत्वनिष्ठ संघटनाहिंदुविरोधी कायदेRelated Newsहिंदु जनजागृती समितीकडून कुंभनगरीत हिंदु राष्ट्राच्या फलकांद्वारे प्रसार January 19, 2025‘कुंभमेळा अंधश्रद्धा आहे’, असे म्हणण्यामागे नास्तिकवाद्यांचे षड्यंत्र – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती January 18, 2025गुन्हेगारी रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकला – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती January 18, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
‘कुंभमेळा अंधश्रद्धा आहे’, असे म्हणण्यामागे नास्तिकवाद्यांचे षड्यंत्र – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती January 18, 2025
गुन्हेगारी रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकला – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती January 18, 2025