Menu Close

भिवंडी (ठाणे) येथील ऐतिहासिक वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती !

वज्रेश्‍वरी मंदिर

ठाणे – भिवंडी तालुक्यातील प्राचीन श्री वज्रेश्‍वरी योगिनीदेवी संस्थानचे पर्यवेक्षक (सुपरवाझर) आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री वज्रेश्‍वरी योगिनीदेवी संस्थानच्या अध्यक्षांकडून याविषयीचे अधिकृत पत्रही फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांना पाठवण्यात आले आहे. मंदिरात येणारे देणगीदार आणि अतीमहत्त्वाच्या व्यक्ती, शासकीय अधिकारी यांचे स्वागत अन् पाहुणचार करणे, न्यायालयीन कामे, देवस्थानच्या भूमीची पहाणी करणे, तसेच मंदिराच्या व्यवस्थापकांना सहकार्य करणे आदी दायित्व फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांच्यावर सोपण्यात आले आहे.

हे पत्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यावर ‘एक तरी चर्च अथवा मशीद यांवर पर्यवेक्षक म्हणून हिंदु व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते का ?’ असा प्रश्‍न उपस्थित करत धर्मप्रेमी हिंदूंकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विश्‍वस्तांचा संपर्क नाही !

या प्रकाराविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने श्री वज्रेश्‍वरी योगिनीदेवी संस्थानच्या विश्‍वस्तांना भ्रमणभाषवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो उचलला नाही.

श्री वज्रेश्‍वरी मंदिराचे महत्त्व !

श्री वज्रेश्‍वरी देवीचे मंदिर हे अप्रतिम वास्तूकलेचा नमूना आहे. गरम पाण्याच्या झर्‍यासाठी वज्रेश्‍वरी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाने या मंदिराला ‘धार्मिक पर्यटनस्थळा’चा दर्जा दिला असून हे मंदिर आणि परिसर यांचा राज्यशासनाकडून विकास करण्यात येणार आहे. नाथ संप्रदायातील मध्ययुगीन संस्कृतीमध्ये श्री वज्रेश्‍वरी मंदिराचा उल्लेख आढळतो. वज्रेश्‍वरीदेवीचे जुने मंदिर येथील जुंगकाटी या गावी होते. सध्याचे मंदिर चिमाजी अप्पा यांनी बांधल्याचे ऐतिहसिक संदर्भ उपलब्ध आहेत.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *