डेहराडून (उत्तराखंड) – येथील विनोदी कलाकार यश राठी यांनी भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याविषयी त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. याविषयीच्या एका वृत्तानुसार, उत्तराखंडच्या डेहराडूनमधील नंदा चौकी येथे एका कार्यक्रमात यश राठी यांनी विनोदाच्या नावाखाली भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले की, ‘जेव्हा येशूने पहिल्यांदा पाण्यावर चालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बुडाला. चप्पलांवर ‘राम’ लिहिले नव्हते; म्हणून तो बुडाला.’
भगवान श्रीरामाचा अवमान केल्याविषयी हिंदु धार्मिक संघटनांनी कार्यक्रमस्थळी निषेध केला. यानंतर भैरव भवानी संस्थेचे अध्यक्ष सागर जैस्वाल यांनी पोलिसांत यश राठी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसंनी यश राठी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
Dehradun: FIR registered against comedian Yash Rathi for objectionable remarks on Lord Ramhttps://t.co/hGh0pR648Z
— OpIndia.com (@OpIndia_com) April 11, 2023
स्रोत : दैनिक सनातन प्रभात