नवी देहली – विदेशातून झालेल्या अर्थपुरवठ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘बीबीसी इंडिया’वर ‘फेमा’ (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) कायद्यांर्गत गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा २ आठवड्यांपूर्वी नोंदवण्यात आला होता आणि आतापर्यंत ‘ईडी’ने ‘बीबीसी इंडिया’च्या एका संचालकासह ६ कर्मचार्यांची चौकशी केली आहे, असे अधिकार्यांनी आता सांगितले.
सक्तवसुली संचालनालयानं आज बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. #BBC #ED pic.twitter.com/IvH1egtSvq
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 13, 2023
ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात