Menu Close

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ या यू ट्यूब वाहिनी वर बंदी !

(म्हणे) ‘तुमच्या चॅनलवरून धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या !’ – यू ट्यूब

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ हे यू ट्यूब चॅनल बंद करण्यात आले आहे. टी. राजा सिंह यांना पहाटे ४ वाजता इमेल पाठवून ‘तुमच्या चॅनलवरून धार्मिक भावना दुखावणारा मजकूर असल्याने ते बंद करण्यात येत आहे’, असे सांगत यू ट्यूब चॅनलकडून ही बंदी घालण्यात आली, अशी माहिती टी. राजा सिंह यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून दिली आहे. या यू ट्यूब चॅनलचे ५ लाख ६९ सहस्र सदस्य होते. यावरून राजा सिंह त्यांचे विविध कार्यक्रम, मार्गदर्शन यांचे थेट प्रक्षेपण करत होते. यापूर्वी राजा सिंह यांच्या फेसबुक खातेही बंद करण्यात आले होते.

 (सौजन्य: Q17 NEWS)

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या यू ट्यूब चॅनलवर कारवाई केली जात नाही ! – टी. राजा सिंह

टी. राजा सिंह म्हणाले की, जावेद करीम, स्टीफन चॅन आणि अन्य एक यांनी यू ट्यूब चॅनल चालू केले आहे. त्यांच्याकडून चालवण्यात येणार्‍या वाहिन्या जगभरातून, तसेच भारतातूनही अब्जावधी रुपयांची कमाई करत आहेत. ‘मी या वाहिनीवरून काय बोललो आणि काय बोलत होतो’, हे हिंदूंना ठाऊक आहे; मात्र हिंदूंच्या देवता, पंतप्रधान मोदी, भाजपचे नेते यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने करणार्‍यांचे यू ट्यूब चॅनल चालू असतांना माझे चॅनल का बंद केले ? यामागे जावेद करीम याचा हात असल्याने ते बंद केल्याचे वाटते. या घटनेमुळे भारतात आता सामाजिक माध्यमांचे एक स्वतंत्र व्यासपीठ असले पाहिजे. अशा माध्यमांना आपण समर्थन करून त्याला साहाय्य करू. असे एखादे माध्यम असल्यास मला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *