आगरा येथील जामा मशिदीच्या पायर्यांच्या खाली पुरलेल्या मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्ती बाहेर काढा ! – कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांची मागणी April 17, 2023 Share On : श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समवेत राष्ट्रव्यापी आंदोलन करणार ! बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री व कथावाचक देवकीनंदन ठाकूर आगरा (उत्तरप्रदेश) – लवकरच मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समवेत घेऊन राष्ट्रव्यापी आंदोलन चालू करण्यात येईल. या आंदोलनाची रुपरेषा सिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. ते म्हणाले की, आगरा येथील जामा मशिदीच्या पायर्यांच्या खाली मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्ती पुरण्यात आल्या आहेत. येथे खोदकाम करून त्या मूर्ती बाहेर काढल्या पाहिजेत. ‘जामा मस्जिद की सीढियाँ खोद कर निकाली जाए प्रतिमाएँ’: देवकीनंदन ठाकुर ने श्रीकृष्ण जन्मभूमि मुक्ति के लिए बड़े आंदोलन का किया ऐलान, बागेश्वर धाम का मिलेगा साथ#DevkinandanThakur #BageshwarDhamSarkar #SriKrishnaJanmabhumihttps://t.co/hl5YDETT6l — ऑपइंडिया (@OpIndia_in) April 15, 2023 आंदोलनाविषयी ठाकूर म्हणाले की, या आंदोलनामध्ये युवकांची भूमिका अधिक महत्त्वाची असणार आहे. या आंदोलनास वज्रभूमी येथून प्रारंभ होईल आणि नंतर आगरा, कानपूर, प्रयागराज यासह संपूर्ण देशातही हे आंदोलन केले जोईल. स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Trending Topicsआंदोलनराष्ट्रीयश्रीकृष्णजन्मभूमीRelated Newsशिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे सोलापूर येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ December 30, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे सोलापूर येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ December 30, 2024
चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024