Menu Close

कर्नाटकमध्ये त्वरित ‘अधिवक्ता संरक्षण कायदा’ लागू करा – अधि. अमृतेश एन.पी., कर्नाटक उच्च न्यायालय

विशेष संवाद : ‘हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावरील गोळीबाराच्या मागे सूत्रधार कोण ?’

अधिवक्ता अमृतेश एन.पी.

अधिवक्ता कृष्णमूर्ती हे विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक नेते आहेत.ते कर्नाटकमधील गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य अधिवक्ता आहेत, तसेच ते हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, स्थानिक हिंदुत्वनिष्ठ यांना नैतिक, धार्मिक आणि कायदेशीरदृष्ट्या पाठिंबा देतात. यामुळेच त्यांना लक्ष्य केले गेले. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांची हत्या करण्याचे हे षड्यंत्र आहे. हिंदुत्वसाठी लढणार्‍यांना आज कुठलेच संरक्षण दिले जात नाही. यासाठी सर्व अधिवक्त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी कायदा करण्याची मागणी आम्ही मागील 5 वर्षांपासून करत आहोत. कर्नाटक सरकारने त्वरित ‘अधिवक्ता संरक्षण कायदा’ लागू करावा, अशी मागणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन.पी. यांनी केली आहे. हिंदु जनजागृती समितीने ‘गौरी लंकेश खटल्यात हिंदुत्ववाद्याच्या बाजूने लढणार्‍या अधिवक्त्यांवर झालेल्या गोळीबारामागे सूत्रधार कोण ?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.

कर्नाटक मध्ये ‘उत्तरप्रदेश मॉडेल’ लागू करा !

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा म्हणाले की, कर्नाटकमध्ये हल्लीच्या काळात 35 हिंदू नेत्यांची निदर्यीपणे हत्या करण्यात आली आहे. यामधील बहुतेक प्रकरणांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ. आय.) आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) या जहाल इस्लामी संघटनांचा हात असल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे. ‘हिंदुत्वासाठी कार्य कराल, तरी असाच परिणाम होणार’ अशी दहशत हिंदुत्वनिष्ठ नेते, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि अधिवक्ता यांच्यामध्ये निर्माण करण्याचा सुनियोजित डाव आहे. काँग्रेस शासन काळात मैसूर जिल्ह्यामध्ये सुनियोजितपणे टोळीच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यात आल्या, तरीही गुन्हेगारांवर आतंकवादी कारवायांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला नाही. या घटनांमागील मुख्य सूत्रधाराला वारंवार जामीन मिळाला आणि सरकारी अधिवक्त्यानेही जामीनास विरोध केला नाही. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या प्रकरणी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयाच्या माध्यमांतून ही प्रकरणे त्वरित मार्गी लावली जात नसल्याने गुन्हेगारांना कोणतीही भीती राहिलेली नाही. अधिवक्ता कृष्णमूर्तींसारख्या अधिवक्त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण दिले पाहिजे. गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेतृत्वाची आज कर्नाटकला आवश्यकता आहे. तरच कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठ यांची हत्या, न्यायाधीशांना धमक्या देणे, हिंदु सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक करणे, असे प्रकार बंद होतील. म्हणून कर्नाटकमध्ये ‘उत्तरप्रदेश मॉडेल’ लागू केला पाहिजे, असेही श्री. गौडा म्हणाले.

या वेळी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या दिव्या बलेहित्तल म्हणाल्या की, आज हिंदु अधिवक्त्यांना लक्ष्य केले जाते. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर आक्रमण करणारा अनुभवी शूटर होता. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली होती; मात्र सुदैवाने ते वाचले. कर्नाटक पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतल्याचे म्हटले आहे; परंतु या प्रकरणी अजूनही कोणालाही अटक झालेली नाही, अशी खंतही अधिवक्ता दिव्या यांनी व्यक्त केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *